allu arjun Sakal
मनोरंजन

Allu Arjun: अल्लू अर्जुनचे इंस्टाग्रामवर आहे सीक्रेट अकाऊंट! खास मित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी करतोय वापर

'पुष्पा 2' या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

Aishwarya Musale

साऊथ सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने एका दिवसापूर्वी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी, त्याच्या 'पुष्पा 2' चित्रपटासाठी लोकांचा उत्साहही खूप आहे.

या चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या या आवडत्या स्टारचे इंस्टाग्रामवर एक नाही तर दोन अकाउंट आहेत.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, अल्लू अर्जुनचे इंस्टाग्रामवर दोन अकाउंट आहेत, एक तुम्हाला माहिती असेल पण त्याने दुसरे अकाउंट सीक्रेट ठेवले आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की केवळ अल्लू अर्जुनच नाही तर इतर अनेक साऊथ आणि बॉलीवूड स्टार्स आहेत जे सोशल मीडियावर त्यांचे सिक्रेट अकाउंट चालवतात, ज्याची चाहत्यांना माहितीही नाही. अल्लू अर्जुन त्याच्या सीक्रेट इंस्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या खास मित्रांसोबत चॅट करतो.

अल्लू अर्जुनचे चाहते इन्स्टाग्रामवर त्याचे सीक्रेट अकाउंट शोधू लागले असतील. अभिनेते या अकाऊंटवर त्याच्या मित्रांसोबत सर्व प्रकारच्या गोष्टी शेअर करतात. दुसरीकडे, त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर, तुम्हाला त्याच्या व्यावसायिक वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि व्हिडिओ पाहायला मिळतील, जे चाहत्यांनाही खूप आवडतात.

दरम्यान, 'पुष्पा: द रुल'मधील अल्लू अर्जुनच्या फर्स्ट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते थांबू शकत नाहीत. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' या चित्रपटाचा टीझर 'पुष्पा कुठे आहे?' या कॅप्शनसह दिसला. यावरून चित्रपटाचा दुसरा भाग खूपच रंजक असणार आहे हे सिद्ध होते.

अल्लू अर्जुन, फहद फासिल, रश्मिका मंदान्ना, धनंजय, राव रमेश, सुनील, अनसूया भारद्वाज आणि अजय घोष हे कलाकार 'पुष्पा 2' मध्ये दिसणार आहेत. चित्रपटाच्या रिलीजबद्दल बोलायचे झाले तर, पुढील वर्षी 2024 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS DHONI: धोनीने CSK मध्ये २५ टक्के हिस्सा मागितला? अखेर फ्रँचायझीने मौन तोडलं; माहीच्या IPL भविष्याबाबतही मोठं अपडेट

धक्कादायक! चार महिन्यांत २०० हून अधिक कैद्यांना HIV ची लागण, सरकारकडून चौकशीचे आदेश

Bank Holiday: सप्टेंबरमध्ये बँका 14 दिवस बंद! सलग 4 दिवस बँकांना सुट्टी; महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद?

UPI AutoPay मध्ये मोठा बदल; App बदललं तरी OTT, SIP आणि EMI चे पेमेंट राहणार सुरू

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी कामरूप जिल्ह्यातील खेत्रीजवळील राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील अपघातस्थळाला भेट दिली

SCROLL FOR NEXT