Actor Aman Dhaliwal attacked with knife in US,video viral Google
मनोरंजन

Viral Video: कोण आहे जोधा अकबर फेम अमन धालीवाल,ज्याच्यावर अमेरिकेत चाकूने हल्ला.. व्हिडीओ पाहून अंगाचा उडेल थरकाप

अमन धालीवाल याच्यावर हा हल्ला जीममध्ये वर्कआऊट करताना एका अज्ञात इसमानं केला आहे. सध्या सोशल मीडियावर हल्ल्याचा तो व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

Actor Aman Dhaliwal attacked with knife : अमेरिकेत पंजाबी अभिनेता अमन धालीवाल याच्यावर जीममध्ये वर्कआऊट करताना अज्ञात इसमानं चाकून वार केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या हल्ल्यात अभिनेता गंभीर पद्धतीनं जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हल्ल्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण या हल्ल्याचा व्हिडीओ मात्र तेजीनं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिपोर्ट्सनुसार हल्ला तेव्हा झाला जेव्हा 'एक कुडी पंजाब दी' फेम अभिनेता जीममध्ये वर्कआऊट करत होता.

हल्लोखोरानं चाकू दाखवला आणि जीम मध्ये जाणाऱ्यांना धमकावू लागला. या हल्ल्यात धालीवाल याच्या अंगावर खूप जखमा झाल्यात आणि या जखमांनी शरीरावर चांगल्याच खूणा सोडल्याचं देखील समोर आलं आहे.

अभिनेता सध्या इस्पितळात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Actor Aman Dhaliwal attacked with knife in US,video viral)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आरोपी जवळच्या लोकांकडे पाणी मागताना दिसत आहे तर अमनवर त्यानं एकीकडे चाकूचा रोख धरला आहे. पण तेवढ्यात अमन चतुराईनं संधी साधताना दिसतो आणि हल्लेखोराला पकडतो.

आणि तेवढ्यात त्याचे आजुबाजूचे लोकही आरोपीनं तिथनं पळून जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसतात. बोललं जात आहे की हा हल्ला अमेरिकेत ३६८५ ग्रॅंड ओक्समधील प्लॅनेट फिटनेस जीममध्ये साधारण सकाळी ९.२० च्या सुमाारास झाला.

हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

धालीवाल मनसा इथला राहणारा आहे आणि त्यानं अनेक बॉलीवूड तसंच पंजाबी सिनेमातून कामं केली आहेत. मॉडेलिंग मधून आपलं करियर सुरू केल्यानंतर तो 'जोगिया वो जोगिया तेरी जोगन हो गया ..' या गाण्यामुळे चर्चेत आलेला पहायला मिळाला.

त्यानं 'एक कुडी पंजाब दी' आणि 'विरसा' सारख्या पॉलीवूड सिनेमातून काम केलं आहे. त्यानं 'जोधा अकबर' मध्ये हृतिक रोशन आणि ऐश्वर्या रायसोबतही काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Blood Donation Recovery: रक्तदान केल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? शरीर कसं रिकव्हर होतं? ‘या’ 3 गोष्टी ठेवा लक्षात

Illegal Sand Mafia Attack: अंबडमध्ये अवैध वाळू उपशावर कारवाईला गेलेल्या तहसीलदारांसह महसूल पथकाला वाळू माफियांची मारहाण; हायवा ट्रक धडक देत पळवले

SCROLL FOR NEXT