Amrish puri  sakal
मनोरंजन

....म्हणून 'मोगॅम्बो खुश हुआ' 'मिस्टर इंडिया' गाजला!

दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांच्या स्मृतींना उजाळा

नरेश शेंडे

मुंबई : सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सिनेचाहत्यांची त्या सिनेमातील अभिनेत्याची (Hero)भूमिका पाहण्याकडे जास्त कल असतो.मात्र,सिनेमांमध्ये (Movie)व्हिलनची भूमिका साकारणं हेही सिनेमाला दर्जेदार बनविण्यासाठी तितकंच महत्वाचं असतं. व्हिलनच्या अनेक भूमिकांमुळे सिनेरसिकांच्या (Movie fans)मनाला भुरळ पाडणारे 'मोगॅम्बो खुश हुआ'या फेमस डायलॅागचे सादरकर्ते अर्थातचं दिवंगत अभिनेते अमरिश पुरी.बॅालिवूडमध्ये अष्टपैलू अभिनयाने (Outstanding acting)सिनेजगतात 'उमदा कलाकार' असा ठसा उमटवणाऱ्या अमरिश पुरी यांचा आज स्मृतीदिन.त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या 'मिस्टर इंडिया' सिनेमातील 'मोगॅम्बो'च्या भूमिकेचा आढावा.(Actor Amrish puri best acting mogambo roll memories on birth anniversary)

'मोगॅम्बो'रोलसाठी पहिली पसंती नव्हती?

१९९० च्या दशकातील पॅरेलल सिनेमांच्यात पडद्यावर सुपरडूपर हिट ठरणारा सिनेमा म्हणचे 'मिस्टर इंडिया'.शेखर कपूर दिग्दर्शित 'मिस्टर इंडिया' सिनेमानं सिनेचाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा सिनेमा पडद्यावर सुपरहिट होण्यामागं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अनिल कपूर यांच्या अप्रतिम अभिनयाचा मोलाचा वाटा होता.अभिनेते अनिल कपूर आणि श्रीदेवी यांची सिनेक्षेत्रात 'उत्कृष्ठ अभिनय करणारे नट'अशी छबी उमटली ती याच 'मिस्टर इंडीया' सिनेमामुळं.खरंतर हा सिनेमा सुपरहिट होण्यामागे अमरिश पुरी यांचं अष्टपैलू अभिनय तितकंच महत्वाचं आहे.त्यांनी साकारलेली 'मोगॅम्बो' भूमिका चाहत्यांच्या मनाला भूरळ पाडणारी आहे.पण,त्यांना 'मोगॅम्बो'ची भूमिका सहजरित्या मिळाली नव्हती.

सिनेनिर्मात्यांकडून अभिनेते अनुपम खेर यांना मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी पहिली पसंती दिली गेली होती.मात्र,काही कारणास्तव निर्मात्यांनी 'मोगॅम्बो'चा रोल खेर यांच्याऐवजी अमरिश पुरी यांना दिला.'मोगॅम्बो'ची भूमिका अनुपम खेर यांना न मिळाल्यानं त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती.पण,अमरिश पुरी यांच्या 'मोगॅम्बो'ची भूमिका पाहून मी मंत्रमुग्ध झालो होतो.अशी स्तुतीसुमनेही खेर यांनी त्यांच्यावर उधळली असल्याचं त्यांनी सांगितलंय.

'मिस्टर इंडिया'चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक अली अब्बास झफर 'मिस्टर इंडिया' सिनेमाचा सिक्वल बनवणार आहेत.या सिनेमाचं नाव 'मिस्टर इंडिया' हेच राहणार आहे.आजच्या सिनेमा कल्चरच्या प्रेक्षकांच्या पसंतीनुसार हा सिनेमा बनविण्यात येणार आहे. नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे.या सिनेमात अभिनेत्री कॅटरिना कैफ भूमिका साकरणार आहे.पौराणिक कथांवर आणि भारतीय लष्करावर आधारीत सिनेमा बनविण्यात येत आहेत,असं अली अब्बास जफर यांनी मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT