Milind Soman meets PM narendra modi Sakal
मनोरंजन

Milind Soman: अभिनेता मिलिंद सोमण पंतप्रधान मोदींच्या भेटीला; त्यांचे आभार मानत म्हणाला...

मिलिंद सोमणने वृंदावन इथून त्याची पत्नी अंकिताने आणलेली कृष्णाची मूर्तीही पंतप्रधानांना भेट दिली.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता मिलिंद सोमणने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बुधवारी मिलिंदने दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधानांसोबतचा स्वतःचा फोटो शेअर केला. नुकत्याच झालेल्या ‘युनिटी रन’ नंतर त्याने पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि दोघांनी ‘खेळ, आरोग्य आणि तंदुरुस्ती यांच्या प्राचीन भारतातल्या संबंधाबद्दल संवाद साधला.

ट्विटरवर दोघांचा फोटो पोस्ट करत मिलिंदम्हणतो की, युनिटी रननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून खूप आनंद झाला. या भेटीत आम्ही क्रीडा, आरोग्य आणि फिटनेस यांच्या प्राचीन भारतीय परंपरांमधल्या संबंधांविषयी चर्चा केली. देशभरात योग आणि आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी ते करत असलेल्या सर्व गोष्टींसाठी मी त्यांचे आभार मानले.”

मिलिंद सोमणने वृंदावन येथून त्याची पत्नी अंकिताने आणलेली कृष्णाची मूर्तीही पंतप्रधानांना भेट दिली. झाशी ते दिल्ली अशी 450 किमी ही युनिटी रन झाली. मिलिंदने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ही युनिटी रन केली होती. त्याने स्वातंत्र्यदिनी झाशीच्या किल्ल्यावरून सुरुवात केली आणि एका आठवड्यानंतर दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ त्याची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT