actor and model milind soman celebrates 7 years of togetherness  
मनोरंजन

जगावेगळ्या प्रेमाची अनोखी कहाणी; 'सात वर्षे झाली कशी कळलंच नाही'

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रख्यात अभिनेता आणि मॉडेल म्हणून प्रसिध्द असणारा मिलिंद सोमण सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्याच्या किना-यावर एक हॉट फोटोशुट केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोव-यात सापडला होता. त्यावेळी त्याच्या त्या कृतीचे त्याची पत्नी अंकिता गोवर हिनं समर्थन केलं होतं. तिलाही नेटक-यांनी ट्रोल केले होते. त्याचं प्रेम आणि लग्न ही जगावेगळी कहाणी आहे. त्याला सात वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं मिलिंदनं एक पोस्ट शेअर केली आहे.

एक आदर्श कपल्स म्हणून मिलिंद आणि अंकिताचे नाव सांगता येईल. त्यांच्यातील बाँडिग हा अनेकासाठी कुतूहलाचा विषय आहे. दोघेही फिटनेसकडे लक्ष देणारे आहेत. त्यांचे फिटनेस संबंधीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याला दोघांच्या चाहत्यांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळताना दिसून आले आहे. त्यांच्या रिलेशनशीपला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी शेअर केलेल्या एका रोमँटिक फोटोला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मिलिंद आणि अंकिताच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापूर्वी त्यांनी एकमेकांना चार वर्षे डेट केले होते. मिलिंदनं अंकिताच्या बरोबर जो फोटो शेअर केला आहे त्याला कॅप्शन देताना त्यानं म्हटलं आहे की, अंकिताची मला नेहमीच साथ राहिली आहे. तिचा पाठींबा सहकार्य माझ्यासाठी महत्वाचे ठरले आहे. मिलिंदनं लिहिले आहे की, आम्ही जवळपास अख्खं जग फिरलो. सात वर्षानंतर जे जाणवलं ते आमच्यासाठी अतिशय महत्वाचे होते. समुद्राची खोली मोजण्यापर्यत ते उंचच उंच अशा पर्वतांवर जाण्यापर्यत आम्ही अनेक गोष्टी एकत्रितपणे शेअर केल्या.

देशभरात अनेक शर्यतीत भाग घेणे, जंगल सफारी, जहाजांचा प्रवास, वाळंवंटात फिरणे हे सारे आमच्यासाठी भन्नाट होते. अंकितानंही एक फोटो शेअर केला आहे. तिनं लिहिलं आहे की, सात वर्षे निघून गेली. आता असे वाटत आहे की काही क्षणच झाले आहेत. मी आशा करते की असे अनेक आनंदाचे क्षण आमच्या वाट्याला येत राहतील. तुला यासाठी धन्यवाद द्यायला मला आवडतात की, तु जसा आहेस तसा तु राहिला आहेस. 52 वर्षांच्या मिलिंदनं 26 वर्षांच्या अंकिताशी लग्न केलं होतं. वयामुळे त्या दोघांना ट्रोल करण्यात आले होते. एका मुलाखतीत त्यानं सांगितले होते की, ज्यावेळी ते पहिल्यांदा भेटले तेव्हा त्यांना लग्नात काहीही रस नव्हता. चार वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांना असे जाणवले की आपण एकमेकांशिवाय राहु शकत नाही. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : राष्ट्रवादी अन् मविआ पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार? अजितदादांचा सतेज पाटील यांना फोन

हृदयद्रावक! भीषण अपघातात मामा-भाचीनंतर सात महिन्यांच्या गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाचाही मृत्यू; कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त

Latest Marathi News Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील शासकीय निवासस्थानी विजयी उमेदवारांचा सत्कार

Kolhapur Flashback : रिक्षाचालकांचा घेराओ, सभात्याग आणि गुप्त खेळी; १९८० ची महापौर निवडणूक इतिहासजमा

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT