actor milind soman  
मनोरंजन

मुंबई ते गुजरात मिलिंद सोमणचा 'अनवाणी प्रवास', कारण...

बॉलीवूडमध्ये फिटनेस bollywood fitess freak फ्रीक म्हणून अभिनेता मिलिंद सोमणची milind soman वेगळी ओळख आहे.

युगंधर ताजणे

मुंबई : बॉलीवूडमध्ये फिटनेस bollywood fitess freak फ्रीक म्हणून अभिनेता मिलिंद सोमणची milind soman वेगळी ओळख आहे. वयाची ६० ओलांडली तरी मिलिंदचा फिटनेस हा नेहमी चर्चेत असणारा विषय आहे. त्याला वर्कआउट करण्यासाठी कुठेही जागा मिळते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यानं त्याच्या एका चित्रपटाच्या सेटवरच वर्कआऊट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याच्या फिटनेस प्रवासाविषयी सांगणार मिलिंग सोमणचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे. आपल्या चाहत्यांबरोबर फोटो काढण्यासाठी मिलिंद वेगवेगळया प्रकारच्या ट्रीक वापरत असल्याचे दिसुन आले आहे. आता मिलिंद चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे एका वेगळ्या विक्रमाची नोंद त्याच्या नावावर झालीयं.

अभिनेता मिलिंदनं आजच्या दिनाचं औचित्य साधून एक संकल्प सोडला आहे. मुंबई ते गुजरात अनवाणी प्रवास करायचा हे त्यानं ठरवलं. आणि त्याची घोषणाही केली. त्यामुळे मिलिंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी देखील त्यानं अशाप्रकारचे वेगवेगळे टास्क केले आहेत. त्यात त्याला त्या प्रवासात चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला आहे. फिटनेस ही मिलिंदची ओळख आहे. त्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी त्यानं आजवर अनेक देश पादाक्रांत केले आहेत. आता तो मुंबईहुन राष्ट्रध्वज हातात धरून गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत अनवाणी धावत जात आपला 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.

15 ऑगस्ट रोजी मुंबईहून निघून 22 ऑगस्ट रोजी सरदार सरोवर डॅम, केवाडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला पोहोचण्याचे त्याने ठरविलं आहे. हे 420 किलोमीटरचे अंतर पार करत असताना त्या 8 दिवसात वाटेत लागणाऱ्या शाळा, रुग्णालये, गावं यांना भेट देत एकता, शांतता आणि आरोग्य यांचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवणार आहे. मिलिंदनं काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील काही राज्यांचा दौरा केला होता. त्यात त्यानं अनेक गावांना भेटी दिल्या. तेथील परिस्थिती जाणून घेतली. चाहत्यांशी संवाद साधला होता. जिथे जाईल तिथे मिलिंदचे चाहते त्याचं मोठ्या उत्साहात स्वागत करत असल्याचे दिसुन आले आहे.

केवळ मिलिंदच नाही तर त्याची आई आणि पत्नी यादेखील आपल्या फिटनेस फ्रीकसाठी ओळखल्या जातात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. मिलिंद जसा त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या वादग्रस्त वागण्यामुळेही चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. विशेषत त्याचे फोटो हे अनेकदा वादाचे कारण ठरले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : पाषाणमध्ये नदीत वाहून आला मृतदेह, ५-६ दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता; हत्या की आत्महत्या?

School Fee: आता युपीआयद्वारे एका क्लिकवर शाळेची फी जमा करता येणार! केंद्र सरकारचे मोठे पाऊल, आदेशाचे पत्र जारी

Latest Marathi News Live Update : कल्याण डोंबिवलीत बाईकचा लाईट लावून अंत्यसंस्कार

भाजपला मोठा धक्का बसणार! बडा नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

Pakistan Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान देशांचे किती सैनिक मारले गेले? वाद नेमका कुठून सुरू झाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT