actor and model Milind soman speaks out about his controversial hot pic running aside beach  
मनोरंजन

'नग्नता' ही तर भारतीय संस्कृती; 'तो' समुद्रकिनारी धावला होता उघडा 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण हा त्याच्या वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी तो गोव्यातील एका समुद्र किनारी हॉट फोटो शुट करताना दिसून आला. त्यानं तो फोटो सोशल मीडियावर शुट केला होता. यामुळे मोठा वाद सुरु झाला. त्याच्यावर गोव्यातील पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मिलिंदचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणा-यांची संख्या मोठी आहे. यामुळे त्याचे कौतूक करणा-यांची संख्या कमी नाही. मिलिंद आता पुन्हा चर्चेत आला आहे याचे कारण म्हणजे त्यानं नग्नतेला अनुसरुन केलेलं विधान जे टीकेचा विषय होताना दिसत आहे.

आपला हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर केल्यानंतर त्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावेळी त्याच्या पाठीशी त्याची पत्नी उभी राहिली. आता मिलिंदनं त्या फोटोविषयी काही मतं व्यक्त केली आहेत. तो म्हणाला लोकांनी माझ्याकडे वाईट दृष्टिकोनातून पाहायचे ठरवले आहे. मी काही चूकीचे केलं आहे असे मला वाटत नाही. मिलिंदनं आपण केलेली पोस्ट कशी बरोबर होती हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. लोकांनी माझ्यावर चूकीचे आरोप केले आहेत. माझी पत्नी अंकितानं माझा तो फोटो काढला होता. त्यात काही चूकीचे आहे असे मला वाटत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार केला तर त्या फोटोमध्ये काही चूक नाही.

मिलिंद म्हणाला, भारतीय परंपरा ही विशाल, विविधांगी आणि सर्वसमावेशक अशा स्वरुपाची आहे. मी अनेक ठिकाणी फिरलो. लोकांशी संवाद साधला. जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये मला फिरण्याचा योग आला त्यावेळी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये कमालीची विविधता आहे. आता यात अडचण अशी आहे की, लोकांना असे वाटते आपण जे काही करतो आहोत ती चांगली संस्कृती आहे. मात्र हेच कोणी दूसरं करायला लागले तर ती लगेच अमेरिकन संस्कृती होऊन जाते. अशा लोकांना माझे सांगणे आहे की अमेरिकेमध्ये नग्न राहणं हे कायद्याच्या विरोधात आहे.

आपल्या देशाच्या काही भागात मात्र हे काही कायद्याविरोधात नाही. अशाप्रकारे एक लॉजिकल पध्दतीचे उत्तर मिलिंदनं दिलं आहे. मला वाटत ही भारतीय संस्कृती आहे. माझ्या त्या फोटोवरुन जर कोणती समस्या उद्भवली असती तर विषय वेगळा होता. इंस्टाग्रामचेही काही नियम आहेत. मला एवढेच वाटते की प्रत्येक समाजाचा एक खास दृष्टिकोन असतो. मात्र त्यामुळे तुम्हाला काही फरक पडण्याचे कारण नाही. 

 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mastani Lake Water Shortage : ऐतिहासिक मस्तानी तलावात यंदा निम्माच पाणीसाठा; कमी पावसामुळे वडकीवर टंचाईचे संकट, वन्यजीवांचे स्थलांतर वाढणार

IND vs PAK Final: वैभव-श्रेयस स्वस्तात परतले, पण अभिषेक-तिलकने डाव सावरला! शेवटच्या षटकांत धावांचा पाऊस; भारताची गाडी २०० पार

Mula Dam Wate : मुळा धरणाचे सर्व अकरा दरवाजे उघडले; नदीपात्रात २,५०० क्यूसेकने पाणी सोडले

Latest Marathi News Live Update : विरारमध्ये उद्घाटन कार्यक्रमावेळी भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड

Harnai Palande Beach Seagull : दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर परदेशी पाहुण्यांचं आगमन! हर्णै-पाळंदेमध्ये झळकले 'सीगल' पक्षी, युरोपमधील वाढत्या तापमानाचा परिणाम?

SCROLL FOR NEXT