actor aniket vishwasrao and his ex wife sneha chavhan participate in bigg boss marathi season 4  sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: अभिनेता अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसह बिग बॉस मध्ये?

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव बिग बॉस मराठीच्या चोथ्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे.

नीलेश अडसूळ

bigg boss marathi 4 : ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरु होणार आहे. महेश मांजरेकर या पर्वाचे सूत्रसंचालन करणार असल्याने अधिकच उत्सुकता आहे. वाद, भांडण, दंगा, प्रेम याने प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा खेळ बराच लोकप्रिय आहे. हा शो काही दिवसांवर आल्याने आता नेमके कोणते कलाकार स्पर्धेत सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. त्यातील काही नावे समोर आली आहे. एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याची घटस्फोटीत पत्नी स्नेहा चव्हाण बिग बॉस च्या चौथ्या पर्वात सहभागी होण्याची शक्यता आहे. (actor aniket vishwasrao and his ex wife sneha chavhan participate in bigg boss marathi season 4 )

बिग बॉसमध्ये कॉन्ट्रोवर्शिअल व्यक्तींना विशेष करुन एंट्री दिली जाते हे गेली अनेक वर्ष प्रेक्षक पाहत आले आहेत. अशीच एक व्यक्ती चौथ्या पर्वात दिसण्याची शक्यता आहे. अभिनयापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव बिग बॉस च्या घरात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नव्हे तर त्याची एक्स पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण देखील बिग बॉसच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यंतरी दोघांनीही घटस्फोट घेतल्यानंतर हे कपल चांगलंच चर्चेत आलं होतं. अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिनं अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करत दोघांवर गंभीर आरोप केले होते. मात्र याबाबात अनिकेत विश्वासरावनं यावर कोणतही उत्तर दिलं नव्हतं.

आता हे दोघे खरच एकत्र येणार का, आणि आले तर काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच उत्सुक आहेत. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्ये अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला नवरा आविष्कार दार्व्हेकर सहभागी झाले होते. त्याच्या नात्यातील ट्विस्टमुळे आणि वादांमुळे तिसरे पर्व चांगलेच गाजले होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT