actor anil kapoor gifted a swanky new car to his wife Sunita Kapoor on her birthday 
मनोरंजन

बायकोला वाढदिवसाच्या निमित्तानं दिली मर्सिडिझ; बॉलीवूडमधलं प्रसिध्द जोडपं

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  वाढदिवसाच्या औचित्यानं कोणी कुणाला काय दिलं हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय असतो. बॉलीवूडमध्ये तर आपल्या आवडत्या कलाकारानं त्याच्या पत्नीला, मुलाला, मुलीला काय भेट दिली हे वाचायला त्यांचे चाहते उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. आताही अशाच एका मोठ्या गिफ्टची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. बायकोच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका प्रसिध्द अभिनेत्यानं पत्नीला मोठी भेट दिली आहे. ज्या गाडीमध्ये आपण बसण्याची आणि फिरण्याची स्वप्न पाहतो अशा अलिशान मर्सिडिज गाडीची भेट पत्नीला देणा-या पतीवर सोशल मीडियातूव कौतूकाचा वर्षाव होत असल्याचे दिसून आले आहे. तो कलाकार अनिल कपूर आहे. त्यानं आपली पत्नी सुनीता कपूर यांना वाढदिवसाच्या निमित्तानं चक्क मर्सिडिज भेट दिली आहे.

केवळ अनिल कपूर नाही तर करण जोहरनंही मोठं गिफ्ट सुनीता यांच्यासाठी पाठवलं आहे. त्यानं सुनीता यांच्यासाठी एक मोठा फुलांचा गुच्छ पाठवला आहे. बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते अनिल कपूर यांनी मोठ्या उत्साहानं सुनीता कपूर यांचा जन्मदिवस साजरा केला. सोशल मीडियावरही सुनीता कपूर यांना चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीता यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अनिलजी यांनी त्यांना चक्क मर्सिडीज भेट दिली आहे. यावेळी अनिल यांनी एका छोट्या पार्टीचे आयोजन केले असून त्यात बॉलीवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रेटी सहभागी होणार आहेत.

90 लाख रुपयांची एक मर्सिडीज अनिलजी यांनी आपली पत्नी सुनीता यांना जन्मदिनाची भेट दिली आहे. ब्लॅक कलरची ही मर्सिडीज सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या ही गाडी अनिलजी यांच्या घराच्या पार्किंगमध्ये आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनिल कपूर आणि सुनीता यांच्या प्रेमाविषयी सा-या ब़ॉलीवूडला माहिती आहे. अनुपम खेर हे अनिल कपूर यांचे शेजारी आहेत. तसेच अनिल कपूर, अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांचे कौटूंबिक संबंध असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांची बॉलीवूडवर चांगली पकड आहे अशी चर्चा आहे.

1984 मध्ये अनिल कपूर यांचे सुनीता यांच्याशी लग्न झाले होते. मेरी जंग नावाच्या एका चित्रपटाच्या सेटवर अनिल आणि सुनीता यांची भेट झाली होती. पहिल्या चित्रपटाच्य़ा प्रदर्शनाबरोबर अनिल कपूर यांनी लग्न केले. अनिल यांचे नाव बॉलीवूडमध्ये असताना अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले  होते. मात्र त्याचा कोणताही परिणाम त्यांच्या वैवाहिक आयुष्यावर झाला नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

SCROLL FOR NEXT