मनोरंजन

अपारशक्ती - आक्रितीची 'गुड न्यूज'

बॉलीवूडचा bollywood प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा ayushman khurana याचा भाऊ म्हणून ज्याला ओळखले जात होतं.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा bollywood प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणा ayushman khurana याचा भाऊ म्हणून ज्याला ओळखले जात होतं. त्या अपारशक्ति खुराणाला दंगल dangal मधून पहिल्यांदा ब्रेक मिळाला होता. त्यात त्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनेकदा त्याच्या अभिनयाचं कौतूकही झालं. त्यानंतर त्याच्या वाट्याला फारसे काही चित्रपट आलेले नाहीत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याचा हेल्मेट नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची सगळीकडे चर्चा आहे. मात्र याशिवाय अपारशक्तिनं त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. तो आता एका मुलीचा बाप झाला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करुन ही माहिती दिली आहे. चाहत्यांनी त्याला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही दिल्या आहेत.

अपारशक्तिनं aparshakti khurana आपल्या मुलीचं नावही ठेवलं आहे. त्या नावाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. अपारशक्तिच्या पत्नीचं नाव आकृती आहूजा असं आहे. अपारनं इंस्टावर एक स्टोरी शेयर करुन याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या मुलीचं नाव अर्जोइ असं ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी अपारशक्तीनं पत्नीसोबतचे काही फोटो शेयर केले होते. त्या फोटोंनाही चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. आता त्यानं एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात त्याची पूर्ण फॅमिली दिसून येते आहे.

आपल्याला मुलगी झाल्याचे कळताच तो चंदीगढला हजर झाला. त्याच्या आगामी चित्रपटांविषयी सांगायचे झाल्यास, तो पहिल्यांदाच एका चित्रपटातून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या त्या चित्रपटाचं नाव हेल्मेट असे आहे. ही एक कॉमेडी फिल्म आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. एका वेगळ्या प्रकारचा सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे. त्याच्या ट्रेलरचीही काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चा होती. त्या चित्रपटात त्याच्या जोडीला प्रसिद्ध अभिनेते मोहनीश बेल यांची मुलगी प्रनुतन ही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT