actor Aroh velankar tweeted about eknath shinde and shivsena politics
actor Aroh velankar tweeted about eknath shinde and shivsena politics sakal
मनोरंजन

राजकीय गदारोळात आरोह वेलणकरची उडी, एकनाथ शिंदेंना टोला.. म्हणाला..

नीलेश अडसूळ

eknath shinde : (Aroh velankar) अभिनेता आरोह वेलणकर हा अभिनयासोबतच सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. शिवाय राजकीय विश्वावरही तो भाष्य करताना दिसतो. त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर तो बराच सक्रिय असतो. त्याचा पाठिंबा उघडपणे भाजप पक्षाला असल्याचे वारंवार दिसले आहे. तो केंद्र सरकारच्या पाठिंब्यासह महाविकास आघाडीवर अनेकदा टीका करत असतो. त्यात गेली दोन दिवस महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय गदारोळावर त्याने भाष्य केले आहे. सध्या राज्यात मोठा राजकीय थरार पाहायला मिळत आहे. शिवसेना (shivsena) नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षाशी बंड करून वेगळाच डाव मांडला आहे. या सर्व गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आरोहने एकनाथ शिंदेंना कोपरखळी मारली आहे. (actor Aroh velankar tweeted about eknath shinde and shivsena politics)

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला चितपट केले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली. यामुळे राज्य सरकार सांभाळणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार डळमळीत होणार असे वातावरण निर्माण झाले. त्यातच एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली. ४० आमदार घेऊन ते राज्याबाहेर रवाना झाले आणि एकाच हाहाकार माजला. ते बराच वेळ 'नॉट रिचेबल' झाले आणि अचानक एक ट्विट समोर आलं. 'आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,' असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. या सर्व घडामोडींचे हादरे बसत असतानाच अभिनेता आरोह वेलणकर यानेही एकनाथ शिंदे यांना उद्देशून ट्विट केले.

'आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,' असे ट्विट एकनाथ शिंदेंनी केले होते. त्यावर आरोह वेलणकरने रिट्विट करत ‘परत जाऊ नका आता म्हणजे मिळवलं’, असा टोला शिंदेंना लगावाला आहे. त्याआधीही आरोह वेलणकरने आणखी एक ट्विट केले होते. 'संपूर्ण राज्य आणि महाराष्ट्रातील मतदारांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये झालेला गोंधळ आणि अनागोंदी पाहावी', असे त्याने या ट्विटमध्ये म्हटले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT