Actor Ayesha Takia’s husband and SP leader accuses CISF of being ‘racist’ at Goa airport Google
मनोरंजन

गोवा विमानतळावर अभिनेत्रीच्या अंगाला हात लावत अधिकाऱ्यांची नवऱ्याला शिवीगाळ

बॉलीवूड अभिनेत्री आयेशा टाकियाचा नवरा फरहान आझमीनं या 'गैरवर्तणुक' प्रकरणाविषयी ट्वीटरवर पोस्ट करुन माहिती दिली आहे,

प्रणाली मोरे

अभिनेत्री आयेशा टाकिया(Ayehsa Takia) आणि तिचा बिझनेसमन नवरा फरहान आझमी(Farhan Azmi) यांना गोवा विमानतळावरील(Goa Airport) अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाचा मोठा फटका बसला आहे. हे पती-पत्नी आपल्या मुलासोबत गोव्याहून मुंबईला परतत असताना हा लज्जास्पद प्रसंग घडला आहे. फरहाननं यासंदर्भात केलेल्या पोस्टच्या माध्यमातून नेमंक त्यांच्यासोबत काय घडलं ते सांगितलं आहे. गोवा विमानतळावरील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फरहानशी बोलताना लिंगविषयक अश्लील भाषा वापरली. आणि पत्नी आयेशाच्या अंगाला गरज नसताना हात लावला अस ट्वीटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. गोवा विमानतळावरील सुरक्षा रक्षकांच्या गैरवर्तनावर फरहाननं पोस्टच्या माध्यमातून बोट ठेवलं आहे. फरहान म्हणालाय,''माझं पासपोर्टवरील नाव वाचताच मला माझ्या कुटुंबापासूव वेगळं करुन चौकशी करण्यात आली. माझ्या पत्नीला-मुलाला माझ्यापासून दूर वेगळं नेऊन त्यांची चौकशी केली गेली''.

फरहाननं आपल्या ट्वीटर अकाऊंटवर त्या विमानतळावरील अधिकाऱ्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. फरहान आणि आयेशा आपल्या मुलासोबत गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते. फरहानं गैरवर्तन केलेल्या अधिकाऱ्यांचे फोटोच नाहीत तर त्यांची नावं देखील शेअर केली आहेत. माझ्याशी जातीभेद केला गेलाय असंही फरहाननं म्हटलं आहे. पासपोर्टवरचं नाव वाचल्यानंतर माझ्यासोबत,माझ्या कुटुंबासोबत गोवा विमानतळावरचे अधिकारी चुकीचे वागले असं फरहाननं म्हटलं आहे.

''एका पुरुष अधिकाऱ्यानं माझ्या बायकोच्या म्हणजेच अभिनेत्री आयेशाच्या अंगाला हात लावला. आणि त्यांना माझ्यापासून दूर केलं. मी जेव्हा त्यांना तिच्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला,ती एक स्त्री आहे,अंतर ठेवून बोला असं म्हटलं तेव्हा माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला गेला. बरं यावरचं हे सुरक्षा अधिकारी थांबले नाहीत तर त्यांनी अतिशय गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली''.

फरहाननं केलेल्या ट्वीटनंतर गोवा विमानतळाकडून त्यांची माफी मागण्यात आली आहे. या प्रकरणात लक्ष घालून संबंधितांवर कारवाई केली जाईल असं आश्वासन गोवा विमानतळानं दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT