bharat jadhav shared devotional post on pandharichi ashadhi wari  sakal
मनोरंजन

'मला तुझ्याकडून काहीच नको..' अभिनेता भरत जाधवची विठुरायाला अनोखी साद..

आषाढी एकादशीचा दिवस जवळ येत असतानाच अभिनेता भरत जाधव याने एक पोस्ट शेयर केली आहे.

नीलेश अडसूळ

bharat jadhav : नाटक, मालिका, चित्रपट अशा एकूणच मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता भरत जाधव कायमच महत्वपूर्ण विषयवार भाष्य करत असतो/ नुकतेच त्याने नाट्यगृहाच्या दुरवस्थेवर लक्ष वेधले होते. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. मनोरंजन क्षेत्रातील काही आठवणी, रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तर कधी एखादे निमित्त साधून आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी भरभरून लिहितो. अशीच एक पोस्ट त्याने महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीच्या विठ्ठलावर लिहिली आहे. त्याच्या या पोस्टमध्ये पांडुरंगाप्रती असलेलं प्रेम, भक्ती आणि निस्सीम भाव दिसून येतो. त्याची ही पोस्ट सध्या बरीच चर्चेत आहे.. (bharat jadhav shared devotional post on pandharichi ashadhi wari)

पंढरपूरची आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे., आज उद्या पालख्या पंढरपूरात दाखल होतील. हळूहळू घराघरातील वातावरण हरीमय होत असतानाच अभिनेता भारत जाधव याने पांडुरंगालाहळवी साद घातली आहे. कपाळावर पांडुरंगाचा बुक्का लावलेला फोटो शेयर करत भारत म्हणतो.. ''मला तुझ्याकडून काहीच नको...मला तू दिलेले चिरंतन देणे वेगळेच आहे..!!'' यासह त्याने एक अभंगही शेयर केलं आहे. त्याच्या ओळी अशा की..

नको तुझे ज्ञान नको तुझा मान।

माझें आहे मन वेगळेंची।।१।।

नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती।

मज आहे विश्रांती वेगळीच।।२।।

चरणी ठेऊनी माथा विनवितो सावता।

ऐका पंढरीनाथा विज्ञापना।।३।।

पंढरीची वारी हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. केवळ शेतकरी, कष्टकरी आणि महाराष्ट्रातला मराठी माणूसच नाही तर कलाकारही या वारीच्या चिंतन सोहळ्यात सहभागी होत असतात. अगदी यंदाच्याही वारीत अभिनेत्री स्पृहा जोशी, प्राजक्ता गायकवाड, संदीप पाठक, दीपाली सय्यद असे अनेक कलाकार सहभागी झाले होते. ज्यांना वारीत जाणे शक्य नाही ते घरूनच पांडुरंगाचं स्मरण करतात. अशीच पांडुरंगाला साद घालत भरत जाधवने ही पोस्ट लिहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT