ghe double : मराठी पडद्यावर विनोदी आणि धमाकेदार चित्रपटाचे लवकरच आगमन होणार आहे. आणि या चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे कॉमेडी स्टार भाऊ कदम यांची दुहेरी भूमिका! काही दिवसांपूर्वी भाऊ कदम यांचा 'पांडू' हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटाने आपल्याला खळखळून हसवलं. आता पुन्हा एकदा भाऊ कदम प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाले आहेत. 'घे डबल' असे या चित्रपटाचे नाव आहे. (bhau kadam lead role in ghe double marathi movie will release on september 30)
जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे भन्नाट टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् चित्रपटाचे निर्माते आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, “जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यातच 'घे डबल' हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. आणि मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार !”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.