actor bhau kadam struggle career and talks about bad days  sakal
मनोरंजन

Bhau Kadam Birthday: अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली होती भाऊ कदमकडे पाठ.. पण आज..

आज अभिनेता भाऊ कदमचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

Bhau Kadam Birthday: मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम कडे पाहिलं जातं, त्याचा चेहराच इतका निरागस आहे की समोरच्याला तो दिसला तरी सहज हसायला येतं.

भाऊने आजवर अनेक मालिकाम नाटक, चित्रपटात काम केले आहे. पान भाऊला खरी प्रसिद्धी मिळाली ते 'फू बाई फू' आणि नंतरच्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे. आज भाऊ घराघरात पोहोचला असला तरी त्यांचं स्ट्रगल खूप मोठं आहे.

आज तो ज्या ठिकाणी विराजमान आहे त्यामागे त्याचे खूप कष्ट आहेत. त्यानं आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रक्षकांना खळखळवून हसवलं आहे. पण त्यामागे त्याने अनेक घाव सोसलेले आहेत एकवेळ अशी होती ती जवळच्या मित्रांनीही त्याची साथ दिली आहे. आज भाऊचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊया ही खास बात..

(actor bhau kadam struggle career and talks about bad days )

भाऊ कदमने आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर काय दिवस पहावे लागतात याबाबत एका मुलाखतीत सांगितले होते. एका पुरस्कार सोहळ्यासाठी भाऊ दुबईला निघाला होता, तेव्हाचा हा किस्सा आहे.

भाऊ म्हणाला, 'दुबईला निघालो तेव्हा पैसेच नव्हते माझ्याकडे. पासपोर्ट किंवा इतर सगळा खर्च मांजरेकर करणार होते, आपण फक्त जायचं.. पण तरीही जाताना खिशात काही तरी असावेत म्हणून मित्रांकडे मागितले. १-२ हजार किंवा ५ हजार द्या मला, असं म्हटलं. पण, त्यांना खात्री नव्हती की मी पैसे परत करेन म्हणून. मी त्यांचे पैसे परत करणार होतो. . काहीतरी करुन ते देणारच होतो. पण कुणीही मला पैसे दिले नाही.'

पुढे भाऊ म्हणाला, 'शेवटी घरच्यांनी मला काही पैसे दिले आणि म्हणाले हे घे, हे ठेव. त्यावर मी विचारलं की हे पैसे कुठून आले. तर ते म्हणाले की अंगठी विकली. आणि, वरुन म्हणाले यातून काहीही पैसे परत आणू नका. तुम्ही वापरा. पण मे पैसे खर्च करायची माझी डेरिंगच झाली. फक्त मुलांसाठी काही गोष्टी घेऊन आलो.'

भाऊने सुरुवातीच्या काळात अत्यंत हलाखीत दिवस काढले. पण त्याच्या अभिनयाने तो इतक्या उंचीवर आहे की त्याला कशाचीही कमी नाही. त्याचा चाहतावर्ग मोठा आहेच, पण त्यांच्या मेहनतीने तो आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT