Actor Christian Oliver and daughters killed in plane crash  Esakal
मनोरंजन

Christian Oliver: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा दोन मुलींसह मृत्यू; समुद्रात कोसळलं खासगी विमान

प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता क्रिश्चियन ऑलिव्हर मृत्यू झाला आहे. त्याचे विमान कोसळल्याने हा अपघातात झाला आहे.

Vaishali Patil

Christian Oliver killed in plane crash: मनोरंजन विश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता क्रिश्चियन ऑलिव्हरचा मृत्यू झाला आहे. त्याचे विमान कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 51वर्षीय क्रिश्चियनसह त्याच्या दोन मुलींनीही आपला जीव गमवला आहे.

या अपघातात त्याच्या 10 वर्षीय मॅडिटा आणि 12 वर्षीय अॅनिक या मुलींचाही मृत्यू झाला आहे. ते प्रवास करत असलेले विमान टेकऑफनंतर काही क्षणांतच बेकिया या कॅरेबियन बेटावर कोसळल्याचे वृत्त आहे. क्रिश्चियनच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तर त्याच्या चाहत्यांचा या बातमीवर विश्वासच बसत नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, क्रिश्चियन आपल्या लेकींसोबत एफ मिशेल विमानतळावरून सेंट लुसियाच्या मार्गावरुन उड्डाण केले आणि टेक ऑफ करताच विमानात तांत्रित बिघाड झाला. काही अंतर पार केल्यानंतर हे विमान कोसळले आणि पाण्यात पडले. तेथील मच्छीमार आणि तटरक्षक लोकांनी विमानातील लोकांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला मात्र ते अपयशी ठरले. या अपघातात वैमानिक रॉबर्ट सॅक्ससह क्रिश्चियन आणि त्याच्या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला.

क्रिश्चियन या विमानात ग्रेनेडाइन्समधील बेकिया या छोट्या बेटावरून सेंट लुसियाला येथे जात होते. नव वर्ष साजरा करण्यासाठी ऑलिव्हर मुलींबरोबर व्हेकेशनवर होता. तेथेच हा अपघात झाला.

क्रिश्चियन ऑलिव्हर हा 51 वर्षांचा होता. क्रिश्चियन ऑलिव्हरने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात खास ओळख मिळवली होती. क्रिश्चियन ऑलिव्हर हा स्पीड रेसर आणि वाल्कीरी या प्रसिद्ध चित्रपटांसाठी प्रसिद्ध होता. तो नुकताच इंडियाना जोन्स या चित्रपटात दिसला होता. त्याने आपल्या कारकीर्दीत 60 हून अधिक चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.

क्रिश्चियनचा शेवटचा चित्रपट 'फॉरएव्हर होल्ड युअर पीस' होता. हा सिनेमा लवकरच रिलिज होणार आहेय. क्रिश्चियनच्या निधनाने चाहत्यांसह सर्वच दु:खी झाले असून सर्वच शोक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT