dilip joshi 
मनोरंजन

'प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते' म्हणत वेब सीरिजमधील शिवीगाळीच्या भाषेवर संतापले जेठालाल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून मध्यमवर्गीय लोकांचं आयुष्य सुंदररित्या रेखाटण्यात आलंय. विशेष म्हणजे ही मालिका यशस्वी करण्यासाठी त्यातील कलाकारांचा मोठा मोलाचा वाटा आहे. यात जेठालाल आणि दयाबेन या दोन पात्रांनी तर प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. दयाबेन हे पात्र दिशा वकानी यांनी साकारलं आहे तर जेठालाल ही भूमिका दिलीप जोशी यांनी साकारली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दिलीप जोशी अनेकदा चर्चेत येत असून आता त्यांनी वेब सीरिजमधील बोल्ड आणि अर्वाच्च भाषेतील संवादावर संताप व्यक्त केला आहे. 

एका युट्युब चॅनलशी बोलताना दिलीप जोशी म्हणाले,“ओटीटीवर अनेकदा चांगले विषय हाताळले जातात, उत्तम कलाकारही असतात. मात्र, बऱ्याच वेळा या सीरिजमध्ये शिवीगाळ किंवा अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात येतो हे चुकीचं आहे. खरं तर या सगळ्याची काहीच आवश्यकता नसते. तुम्ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करता. पण तुम्ही नेमकं काय दाखवता यावर सगळं आधारित आहे. कारण आपण जे सादर करतो ते कायम प्रेक्षकांच्या मनावर कोरलं जातं. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने अपशब्दांचा वापर करावा अशी तुमची इच्छा आहे का? प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते. त्यामुळे त्या चौकटीत राहून काम केलं तरच ते काम करण्याची मज्जा आहे. पण जर तुम्ही ती चौकट मोडून काम करत असाल तर पुढे त्यावरुन तुम्हालाच संकटांचा सामना करावा लागेल” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

ते पुढे म्हणतात, “मान्य आहे की बदल होण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण जे पाश्चिमात्य संस्कृतीत केलं जातं तेच आपण आपल्या इथे करण्याचा प्रयत्न करतोय.पण आपली संस्कृती आणि सभ्यता अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आपण त्याकडे लक्ष न देता पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत. त्यांच्याकडे आई-वडिलांवरुन अर्वाच्च भाषेत बोलणं चालतं. आपल्याकडे तसं नाही. तुम्ही तुमच्या आई-वडिलांशी याच पद्धतीने बोलू शकता?” असा सवाल त्यांनी निर्मात्यांना केला. या मुलाखतीत दिलीप जोशी यांनी त्यांच्या 'तारक मेहता का उलटा चष्मा'विषयीदेखील अनेक गोष्टींचा खुलासा केला. जेव्हा तुम्ही कॉन्टीटीचा विचार करता तेव्हा तुमची क्वालिटी घसरते याचीही त्यांनी जाणीव करुन दिली.  

actor dilip joshi angry on use of bad language on ott shows  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एका षटकात ३३ धावा! Liam Livingstone ची अफलातून फटकेबाजी, ३८ चेंडूंत ८२ धावा; सुनील नरीनचाही मोठा पराक्रम, Video Viral

Satara Accident: 'कोडोलीतील युवकाचा ट्रकने चिरडल्याने मृत्यू'; एकजण जखमी, जिवलग मित्र दुचाकीवरुन निघाले अन्..

Winter Tourism: आदि कैलास अल्ट्रा रनपासून डेस्टिनेशन वेडिंगपर्यंत, उत्तराखंडचे हिवाळी पर्यटन पंतप्रधानांना देखील भावले, केली मन की बात

World Disablity Day: दिव्यांगजनांना ३०० वरून १,००० रुपयांपर्यंत पेन्शन वाढ; योगींनी व्हीलचेअर वाटपासह केल्या अनेक योजना जाहीर

Latest Marathi News Live Update : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढणार

SCROLL FOR NEXT