Actor Dilip Kumar's Younger Sister Saeeda Khan Passes Away After Battling A Prolonged Illness  SAKAL
मनोरंजन

Saeeda Khan: दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची धाकटी बहिण सईदा खान यांचं निधन

दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे

Devendra Jadhav

दिग्गज दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची धाकटी बहीण सईदा खान यांचे रविवारी, 24 सप्टेंबर रोजी निधन झाले. बातम्यांनुसार, दीर्घ आजाराशी झुंज देत त्यांचे निधन झाले. मदर इंडिया आणि अंदाज फेमचे दिवंगत निर्माते मेहबूब खान यांचा मुलगा दिवंगत इक्बाल खानशी तिचा विवाह झाला. इक्बाल वांद्रे येथील प्रसिद्ध मेहबूब स्टुडिओचे विश्वस्त होते. मंगळवार, 26 सप्टेंबर रोजी स्टुडिओमध्ये सईदासाठी प्रार्थना सभा होणार आहे.

(Actor Dilip Kumar's Younger Sister Saeeda Khan Passes Away)

ETimes च्या वृत्तानुसार, कुटुंबातील एका जवळच्या सूत्राने सांगितले की, सईदा यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. सईदा या अतिशय प्रेमळ व्यक्ती होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी इल्हाम आणि मुलगा साकिब आहे. ज्यांनी 2018 मध्ये इक्बालच्या निधनानंतर आईची देखभाल केली. इल्हाम एक लेखक आहे, तर साकिब एक निर्माता आहे.

दिलीप कुमार यांचे सुमारे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यातील काही दुव्यांपैकी सईदा ही एक होती. दिलीप कुमार यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी ७ जुलै २०२१ रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.

त्यांच्या बहिणीप्रमाणे दिलीप साब सुद्धा दीर्घ आजाराशी झुंज देत होते. सईदा यांच्या निधनाने दिलीप कुमार यांच्या कुटुंबातील अजुन एक तारा निखळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT