actor dino morea christmas celebration with pm narendra modi  SAKAL
मनोरंजन

PM Modi Christmas Celebration: पंतप्रधान मोदींसोबत अभिनेता डिनो मोरियाने केलं ख्रिसमस सेलिब्रेशन

अभिनेता डिनो मोरियाने पंतप्रधान मोदींसोबत खास सेलिब्रेशन केलंय

Devendra Jadhav

PM Modi Christmas Celebration: बॉलीवूड सेलिब्रिटी ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. ख्रिसमसच्या दिवशी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी खास सेलिब्रेशन करण्यात आलंय.

25 डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ख्रिसमस सेलिब्रेशनचेही आयोजन करण्यात आले होते. जिथे अनेक ख्रिश्चन समाजातील लोकं पोहोचले होते. या सर्वांसोबतच बॉलिवूड अभिनेता डिनो मोरिया देखील या सोहळ्याचा एक भाग झाला.

डिनो मोरिया पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी

डिनो मोरियाने ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. डिनोने पीएम मोदींशी संवाद साधतानाचे फोटो शेअर करुन एक पोस्टही लिहिली आहे.

डिनोने ख्रिसमस सेलिब्रेशन केलेच शिवाय त्याने मोदींच्या निवासस्थानी असलेल्या खास ख्रिसमस लंचमध्ये सहभाग घेतला. हे फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींचे आभार मानले

डिनो मोरियाने मानले मोदींचे आभार

डिनो मोरियाने अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्याने लिहिले - यंदाचे ख्रिसमस लंच खूप सुंदर होते. ख्रिसमसच्या जेवणासाठी आम्हाला तुमच्या घरी आमंत्रित केल्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. तुम्हाला भेटणे आणि तुमच्याकडून ऐकणे आणि तुम्ही किती दयाळू आहात याची जाणीव होणे खरोखरच संस्मरणीय आहे. धन्यवाद सर.

डिनो मोरियाचं वर्कफ्रंट

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर डिनो मोरिया शेवटचा तेलुगू चित्रपट 'एजंट'मध्ये दिसला होता. हा चित्रपट गेल्या वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटाद्वारे डिनो दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. डिनोने ओटीटीवर पदार्पण केले आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर त्याची 'द एम्पायर' सिरीज प्रदर्शित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT