actor director hemand dhome birthday wish to wife kshitee jog  SAKAL
मनोरंजन

Hemant Dhome - Kshitee Jog: "गेलं वर्ष तर तू गाजवलंस आता..", पाटलीणबाईच्या वाढदिवशी हेमंत ढोमे मनातलं बोलला

हेमंत ढोमे क्षितीला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत

Devendra Jadhav

Hemant Dhome birthday wish to Kshitee Jog: हेमंत ढोमे - क्षिती जोग हे सोशल मीडियावरील चर्चेतलं कपल. हेमंत - क्षिती यांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या कामाचं कौतुक करत असतात. दोघेही रिअल लाईफमध्ये नवरा - बायको आहेत. हेमंत अनेकदा सोशल मीडियावर क्षितीबद्दल प्रेम दर्शवत असतो.

आज क्षितीचा वाढदिवस. त्यानिमित्ताने हेमंतने क्षितीचा फोटो पोस्ट करुन तिच्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे.

हेमंतची क्षितीसाठी खास पोस्ट

हेमंत ढोमेने सोशल मीडियावर क्षितीचा झिम्मा 2 मधला फोटो पोस्ट केलाय. हेमंत लिहीतो,"या फोटोतलं हसू कायम असंच राहूदे! आपल्या लाईफची एनर्जी! जशी आहेस तशीच रहा, मालकीणबाई… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! गेलं वर्ष तर तू गाजवलंस, असंच कमाल काम करत रहा… येणारं वर्ष सुद्धा तुला जे हवं ते देईल! Love you…"

क्षितीने २०२३ गाजवलं

२०२३ हे वर्ष क्षितीसाठी चांगलं गेलं. २०२३ मध्ये क्षितीने आलिया भट - रणवीर सिंगसोबत रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात काम केलं. करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात क्षितीने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. क्षितीने या सिनेमात रणवीरच्या आईची भूमिका साकारली.

याशिवाय हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 सिनेमात क्षितीने साकारलेल्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली. अशाप्रकारे क्षितीने २०२३ वर्ष गाजवलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT