actor emraan hashmi will be played villain in ranveer singh don 3 farhan akhtar  SAKAL
मनोरंजन

Don 3: रणवीर सिंगच्या 'डॉन 3' मध्ये हा लोकप्रिय अभिनेता होणार खलनायक? सर्वांना उत्सुकता

हा लोकप्रिय अभिनेता डॉन 3 मध्ये खलनायकाची भूमिका साकारणार आहे

Devendra Jadhav

Don 3 Ranveer Singh News: काही महिन्यांपुर्वी रणवीर सिंगची झलक असलेल्या डॉन 3 सिनेमाची घोषणा करण्यात आली. यावेळी रणवीरच्या लूकची खुप चर्चा झाली. डॉन 3 मध्ये आणखी कोणते कलाकार असणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अखेर डॉन 3 बद्दल मोठी बातमी समोर आलीय.

डॉन 3 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत बॉलिवूडमधील मोठा सुपरस्टार झळकणार आहे. कोण आहे तो? वाचा सविस्तर..

डॉन 3 मध्ये इमरान हाश्मी खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच YRF स्पाय युनिव्हर्सच्या 'टायगर 3' चित्रपटात इमरान खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

ज्यामध्ये इमरानच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. रिपोर्ट्सनुसार, इमरान फरहान अख्तरच्या आगामी 'डॉन 3' चित्रपटाचा भाग असणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चाहते पुन्हा एकदा इमरानला खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

इमरान पुन्हा दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, इमरान हाश्मी निर्माता फरहान अख्तरच्या आगामी 'डॉन 3' चित्रपटाचा एक महत्वाचा भाग बनणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची शक्यता आहे.

मात्र निर्माता फरहान अख्तर किंवा इमरानने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. इमरान काही दिवसांपुर्वी फरहान अख्तरच्या ऑफिसमध्ये दिसला होता. डॉन 3 मध्ये रणवीरसोबत इमरान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची दाट शक्यता आहे.

रणवीर सिंग साकारणार 'डॉन'ची भूमिका

'डॉन 3' मध्ये सुरुवातीला शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात होते, मात्र नंतर या चित्रपटासाठी रणवीर सिंगच्या नावाला मंजुरी देण्यात आली.

याआधी अभिनेत्रीच्या मुख्य भूमिकेसाठी कियारा अडवाणीच्या नावाचा विचार केला जात होता, मात्र नंतर क्रिती सेनॉनच्या नावाच्या अफवा ऐकायला मिळाल्या. पण आता, शोभिता धुलिपाला डॉन मध्ये हिरोईन दिसणार असल्याची शक्यता आहे.

आता इमरान आणि रणवीर डॉन 3 मध्ये आमनेसामने आल्यास प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT