Actor hardik Joshi is under misery over sad demise of his sister in law SAKAL
मनोरंजन

Hardeek Joshi: हार्दिक जोशीवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

हार्दिक जोशीचं कुटुंब शोकसागरात बुडालं आहे

Devendra Jadhav

Hardeek Joshi News: हार्दिक जोशी हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. हार्दिक तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादाच्या भुमिकेमुळे लोकप्रिय झाला.

हार्दिकचा जाऊ बाई गावात हा नवीन शो झी मराठीवर सुरु होतोय. त्यामुळे हार्दिक चर्चेत आहे. पण या शोच्या आधीच हार्दिकवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हार्दिकच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याने त्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन दुःख व्यक्त केलंय.

हार्दिक जोशीच्या वहिनीचं निधन झालंय. हार्दिकने सोशल मीडियावर वहिनीसोबतच्या आठवणी पोस्ट करुन खास पोस्ट लिहीलीय. हार्दिक लिहीतो, "ज्योती वहिनी तू आज आमच्यात नाहीयेस पण तूझं अस्तित्व आमच्यात कायम राहील..जाऊ बाई गावात हा जो नवीन शो मी करत आहे झी मराठीवर तो फक्त तुझ्यामुळे तो पुर्ण शो मी फक्त तुलाच डेडिकेट करतोय कारण तू माझा हात हातात घेऊन प्रॉमिस घेतलं होतस की हार्दिक काही झालं तरी हा शो तू करणारच आहेस आणि योगायोग असा आहे की 4 डिसेंम्बर च्या दिवशी हा शो टीव्हीवर दिसायला सुरुवात होणार आहे आणि त्याच दिवशी तुझा वाढदिवस आहे.

हार्दिक पुढे लिहीतो, "मी नेहमी कामाला जाताना तुला नमस्कार करायचो तेव्हा कायम डोक्यावर हात फिरऊन तू मला आशीर्वाद द्यायची. तुझा आशीर्वाद असाच कायम माझ्या पाठीशी असुदे
आज मी जे काही आहे त्यात तुझा खुप मोठा वाटा आहे.
तु सदैव आई, बहिण, मैत्रीण म्हणुन माझ्या सोबत पाठीशी होतीस तशीच कायम रहा ही विनंती करतो. तुझी उणीव कायम भासत राहिल
Miss you माझी लाडकी वहिनी मला कधी विसरु नको
Always love you always khup khup miss you"

हार्दिकचा झी मराठीवर जाऊ बाई गावात नावाचा आगळावेगळा शो सुरु होतोय. हार्दिकला हा शो स्वीकारायला ज्या वहिनीने प्रोत्साहन दिलं ती जग सोडून गेल्याने हार्दिक शोकसागरात बुडाला आहे.

हार्दिकचा हा नवीन शो ४ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता झी मराठीवर सुरु होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: ''...तर 'मातोश्री'चा एक भाग राज ठाकरेंना द्या'', नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाच्या मृत्यूसाठी अँटी-एजिंग औषधांचा 'कॉकटेल' ठरला जीवघेणा? वाचा डॉक्टरांचा इशारा

ENG vs IND, 2nd Test: भारताच्या प्लेइंग-११ मध्ये तब्बल ३ बदल! बुमराहबद्दलही शुभमन गिलने दिले अपडेट

Prasad Tamdar Baba : हायटेक फ्रॉड ! मोबाईलमध्ये शिरून सगळं पाहतोय 'बाबाचा प्रसाद'..तुमच्या फोनमध्ये कुणी 'हे' अ‍ॅप डाऊनलोड केलंय का असं ओळखा

Latest Maharashtra News Live Updates : घाटकोपरमधील गावदेवी मंदिराजवळ एका घरात सिलेंडरचा स्फोट

SCROLL FOR NEXT