Actor Harish dudhade will play role of Bahirji Naik in Fatteshikast 
मनोरंजन

‘फत्तेशिकस्त’मध्ये 'हा' कलाकार साकारणार बहिर्जी नाईक

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते आणि या गुप्तहेर खात्याचा कणा होते त्याचे प्रमुख बहिर्जी नाईक. मराठा इतिहासातील महानायकच! आणि भारतातील गुप्तहेर संस्थेचे जनकच! बेमालूम वेशांतर करण्याचं कसब, भाषाचातुर्य, युद्धनीती, कुटनीती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असलेल्या बहिर्जींच्या अफाट कामगिरीच्या मदतीने स्वराज्याच्या असंख्य मोहिमा सफल झाल्या. याच बहिर्जी नाईक यांची दमदार भूमिका अभिनेता हरिश दुधाडे आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात साकारणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र झळकणार आहे.

आजवर विविधांगी भूमिका साकारत हरिश दुधाडेने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रंगभूमी  आणि छोटा पडदा गाजवल्यानंतर आता मोठ्या पडद्यावर हरिश वेगवेगळ्या रुपात दिसणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. हरीश यांच्या बहुरूपी भूमिका हे चित्रपटाचे खास वैशिष्टय़ ठरणार असून चित्रपटात अघोरी, कव्वाल,पोतराज यासारख्या नऊ विविध भूमिका हरीश यांनी आपल्या खास शैलीत साकारून चित्रपटाची रंगत वाढवली आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना हरीश सांगतो की, बहिर्जी नाईक यांची भूमिका करायला मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला मिळणे हे एक आव्हान असते आणि कलाकारालाही ते आव्हान स्वीकारायला आवडते. मला ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात तशी संधी मिळाली ही नक्कीच आनंदाची बाब आहे.

ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत. १५ नोव्हेंबरला ‘फत्तेशिकस्त’ प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

Baramati Crime: बारामतीत राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला; गोळीबाराचा प्रयत्न, हाताला जखम

SCROLL FOR NEXT