hrithik roshan
hrithik roshan  file image
मनोरंजन

ह्रतिकने केली 'क्रिश ४'ची घोषणा; प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि डान्सच्या स्टाईलने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता ह्रतिक रोशनच्या (hrithik roshan) क्रिश या चित्रपटाला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने ह्रतिकने नुकताच सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून ह्रतिकने 'क्रिश'च्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ह्रतिकने या व्हिडीओमधून 'क्रिश-4'ची (krrish 4) घोषणा केली आहे. ह्रतिकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'क्रिश' या भूमिकेचा मास्क दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करून ह्रतिकने त्याला कॅप्शन दिले, 'भूतकाळ झाला, चला भविष्यात काय घडते ते पाहूयात.. क्रिश 4' (actor hrithik roshan announce krrish 4 on 15th anniversary of krrish shares video)

२३ जून २००६ रोजी क्रिश चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रत्येक भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. २००३ मध्ये 'कोई मिल गया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्याच पुढची कथा 'क्रिश' या चित्रपटात पहायला मिळाली. यामध्ये हृतिकसोबत प्रियांका चोप्रा, रेखा हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये दिसले होते. आता क्रिश-4 बद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२० मध्ये ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत असे सांगितले होते की, 'विविध कारणांमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 'या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.'

मिड-डे च्या एका रिपोर्टनुसार क्रिश-4 मध्ये ह्रतिकच मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये रोहित टाइम ट्रॅव्हल करणार आहे. क्रिश आणि एलियनची मैत्री पुन्हा प्रेक्षकांना पहायला मिळाणार आहे अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT