irfan khan 
मनोरंजन

`अंग्रेजी मिडीयम`चा प्रीमियर रशियामध्ये का झाला नाही, वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः अभिनेता इरफान खानचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट अंग्रेजी मिडियम. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाचा भव्य प्रीमियर रशियामध्ये होणार होता. तेथील भाषेत हा चित्रपट डब करण्यात येणार होता आणि रशियातील जवळपास चारशे ते पाचशे चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र भारतात लगेच लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आणि या चित्रपटाचा तेथील भव्य प्रीमियर होऊ शकला नाही. तरीही हिंदी भाषेतील हा चित्रपट रशियातील चाळीस चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तब्बल तीन आठवडे तो तेथे मुक्काम ठोकून होता.

भारतात लाॅकडाऊन होण्यापूर्वी इरफान खानचा अंग्रेजी मिडियम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.आणि लगेच लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. साहजिकच त्याचा फटका या चित्रपटाला बसला. तृप्ती एण्टरटेन्मेंटने हा चित्रपट रशियामध्ये भारतातील लाॅकडाऊननंतरही लावलेला होता. हिंदी भाषेतील तो चित्रपट १३ मार्च रोजी तेथील चाळीसेक चित्रपटगृहात लागला होता. पण कोरोनामुळे म्हणावा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद या चित्रपटाला लाभला नाही. तरीही तीन आठवडे हा चित्रपट तेथे होता आणि त्याने बऱ्यापैकी व्यवसाय केला.

तृप्ती एन्टरटेन्मेंटच्या हरेश सांगानी यांनी या चित्रपटाचे रशियातील वितरणाचे हक्क घेतलेले होते. १३ मार्च रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी तो रशियामध्येही झळकला. याबाबत तृप्ती एन्टरटेन्मेंटचे हरेश सांगानी म्हणाले, की आम्ही हा चित्रपट रशियन भाषेत डब करणार होतो आणि तेथे भव्य असा प्रीमियर ठेवणार होतो. ज्या चित्रपटगृहात हा प्रीमियर आयोजित करण्यात येणार होता ते अतिभव्य आणि दिव्य असे चित्रपटगृह होते. बावीचशे आसनव्यवस्था होती आणि बाराशे ते पंधराशे तिकीट दर होते. त्याशिवाय पोलंड, जर्मनी, साऊथ कोरिया, ब्राझील व फ्रान्स येथेही हा चित्रपट त्या त्या भाषेत डब करून लावायचा होता. त्याबाबतची सर्व तयारी आम्ही पूर्ण केली होती. रशियन भाषेतील ट्रेलरही आम्ही बनविला होता. काही पोस्टर्सही आम्ही रशियन भाषेत बनविली होती. या चित्रपटाच्या टीमबरोबरच भारतातील काही मान्यवर मंडळींनाही तेथे घेऊन जायचे असा आमचा विचार सुरू होता. पण कोरोनामुळे सगळ्याच देशात लॉकडाऊन झाले आणि माझा सगळा प्लॅन विस्कळीत झाला. रशियातील प्रीमियरला इरफानला न्यायचे होते. पण कोरोनामुळे काहीच करता आले नाही.

अंग्रेजी मिडीयम हा चित्रपट इरफानचा शेवटचा चित्रपट ठरला. जवळपास अकरा महिन्यांच्या उपचारानंतर तो भारतात परतला होता. नव्या जोमाने इरफानने त्याच्या कामाला सुरुवात देखील केली होती. मात्र इरफानची ही अचानक एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. 

actor irfan khan english medium film has not premiered in russia

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT