actor Kazan Khan dies due to heart attack SAKAL
मनोरंजन

Kazan Khan Dies: सुप्रसिद्ध अभिनेता कझान खानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, खुनशी खलनायक हरपला

मल्याळम अभिनेता कजान खानने या जगाचा निरोप घेतला आहे

Devendra Jadhav

Kazan Khan Dies: गेल्या काही दिवसांमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स मृत्यूच्या विळख्यात सापडले होते. नुकतेच 'असुरन' चित्रपटाचा सहाय्यक अभिनेता रस्ता अपघातात ठार झाला आणि आता मल्याळम अभिनेता कजान खानने या जगाचा निरोप घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेते कजान खान यांचे १२ जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

(actor Kazan Khan dies due to heart attack)

प्रॉडक्शन कंट्रोलर आणि प्रोड्यूसर एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कजान खान यांच्या निधनाची माहिती दिली. एनएम बदुशा यांनी फेसबुकवर कजान खानचा एक फोटो शेअर केला आहे. कजान खानने 1992 मध्ये सेंथामिझ पटू या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर त्याने 'सेतुपती आयपीएस', 'कलाईगनन', 'मुराई मामन' आणि 'करुप्पा नीला' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. कजान खानने तमिळ आणि मल्याळम भाषेतील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. तो खलनायक आणि नकारात्मक पात्रांसाठी ओळखला जात असे..

कजान खान जेव्हा चित्रपटाच्या पडद्यावर दिसायचा तेव्हा खलनायकाच्या भूमिकेतील त्याचा भयानक अवतार आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून प्रेक्षक घाबरायचे. कजान खानने खलनायकाच्या पात्रांनी लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते आणि तो सर्वांचा आवडता बनला होता. क्वचितच खलनायक साकारणाऱ्या अभिनेत्याला प्रेक्षकांचे इतके प्रेम मिळते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT