Milind Shinde 
मनोरंजन

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मिलिंद शिंदेंची होणार एण्ट्री |Milind Shinde

मिलिंद शिंदे साकारणार कबड्डी प्रशिक्षकाची भूमिका

स्वाती वेमूल

मिलिंद शिंदे साकारणार कबड्डी प्रशिक्षकाची भूमिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं Sukh Mhanje Nakki Kay Asta मालिकेचं कथानक सध्या रंगतदार वळणावर आलं आहे. सुडाने पेटलेली शालिनी संपूर्ण शिर्केपाटील कुटुंबाला आपल्या तालावर नाचवते आहे. घराचा आणि कंपनीचा ताबा तर तिने घेतलाच आहे. मात्र ही मालमत्ता परत हवी असल्यास माझ्यासोबत कबड्डीचा डाव जिंकावा लागेल अशी अट तिने घातली आहे. त्यामुळे शिर्केपाटील कुटुंबासमोर सामना जिंकण्याचा एकमेव पर्याय उरला आहे. कबड्डीचा सामना खेळायचा म्हणजे प्रशिक्षक हवा. त्यामुळे कबड्डी प्रशिक्षकाच्या भूमिकेत मिलिंद शिंदे Milind Shinde यांची एण्ट्री होणार आहे.

या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद शिंदे म्हणाले, "मी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. भैरु असं त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. मी पहिल्यांदाच प्रशिक्षकाची व्यक्तिरेखा साकारतो आहे. मी दिल्लीला शिकायला होतो तेव्हा काही शाळा आणि कॉलेजमध्ये वर्कशॉप घ्यायचो. त्याचीच मदत मला ही व्यक्तिरेखा साकारताना होते आहे. मी कबड्डी कधीच खेळलो नाही. मला क्रिकेट खेळायला आवडतं पण मला जमत नाही. त्यामुळे ही भूमिका नक्कीच आव्हानात्मक आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतात, त्यामुळे या मालिकेचा भाग होता आला याचा आनंद आहे.’

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. यामध्ये गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Force Plane Crash : राजस्थानात वायुसेनेचे विमान कोसळले, पायलटसह सहकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर, राहुल गांधीही परदेशातून परतले

Latest Maharashtra News Live Updates: वर्धा जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम

Inspiring Story:'वयाच्या साठीत ५० हजार किलोमीटर सायकल प्रवास'; चंद्रकांत सूर्यवंशी यांनी निवृत्तीनंतर जोपासला छंद

Mumbai Mill Workers Protest : मीरा भाईंदर झाकी है! गिरणी कामगारांच्या आंदोलनासाठी सेना-मनसे आले एकत्र; बाळा नांदगावकर म्हणाले...

SCROLL FOR NEXT