Junior Mehmood Passed Away 
मनोरंजन

Junior Mehmood Passed Away : अभिनेते ज्युनियर मेहमूद यांचे निधन; वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ते पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती.

रोहित कणसे

Junior Mehmood Passed Away : ज्युनियर मेहमूद या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते नईम सय्यद यांचे काल रात्री 2 वाजता मुंबईत निधन झाले. ते पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते आणि गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. आजच्या दुपारच्या प्रार्थनेनंतर सांताक्रूझ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

नईम सय्यद यांनी वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. नुकतेच त्यांनी आपले मित्र जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांचीही भेट घेतली होती. त्यांनी मित्रांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्या भेटीचे फोटोही समोर आले होते, ज्यात ज्युनिअर महमूदची अवस्था पाहून जितेंद्रचे डोळे ओले झाले होते. जॉनी लिव्हरनेही त्यांची भेट घेऊन हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

ज्यूनियर महमूद यांनी त्यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांचे खरे नाव नईम सैय्यद होतं. त्यांचा जन्म नोव्हेंबर १९५६ साली झाला होता. त्यांनी आपल्या करिअरमध्ये २६५ हून अधिक चित्रपटात काम केलं होतं.त्यांनी तब्बल सात भाषांमधील चित्रपटांत काम केलं होतं, त्यांनी मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते. जौहर महमूद इन हॉन्ग कॉन्ग, गुरू और चेला, बॉम्बे टू गोवा या चित्रपटांमधून त्यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT