actor Nasiruddin shah said love jihad is a Tamesha in Uttar Pradesh 
मनोरंजन

युपीत 'लव जिहाद' चा तमाशा; हिंदू - मुस्लिमांमध्ये दरी वाढविण्याचा प्रयत्न

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - केवळ अभिनेता नव्हे तर एक कार्यकर्ता आणि विचारवंत म्हणून नसरुद्दीन शहा प्रसिध्द आहे. समाजात जे चूकीचे घडते त्यावर बेधडकपणे विचार करुन त्यावर ठाम राहणे त्यांना जमले आहे. यामुळे ते अनेकदा अडचणीतही आले आहेत. यावरुन त्यांना जवळच्या मित्रांची नाराजी ओढावून घ्यावी लागली आहे. आता ते पुन्हा त्यांच्या एका वक्तव्यावरुन चर्चेत आले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षभरापासून लव जिहादचा प्रश्न सातत्यानं डोकेदुखीचा विषय झाला आहे. त्यावरुन युपीमध्ये स्वतंत्र कायद्याची निर्मितीही करण्यात आली आहे. तरीही तो प्रश्न चर्चेत येत आहे. यावरुन शहा यांनी कडवट प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या आंतरधर्मिय लग्नाबाबतही यावेळी खुलासा केला आहे. ते म्हणाले, मुळात लव जिहाद नावाची संकल्पना ज्यापध्दतीने लोकांच्या समोर आणली जात आहे त्यातून नकारात्मक विचार पसरविण्याचे काम मोठ्या पध्दतीने केले जात आहे. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील दरी वाढविण्यासाठी अशाप्रकारच्या वेगळे विचार पुढे आणले जात आहेत.

माझे रत्ना पाठकशी लग्न झाले. त्यावेळी माझ्या आईनं मला असे विचारले होते की, रत्ना धर्म बदलेल का, आईच्या त्या प्रश्नाचे उत्तर मी नाही असे दिले होते. मला नेहमीच असे वाटले की माझे लग्न हे समाजासाठी कायम आदर्श उहाहरण असेल म्हणून. आम्ही आमच्या मुलांना धर्माबाबत शिकवण दिली आहे. केवळ आपल्याच नाही सर्व धर्मांविषयी त्यांना समजावून सांगितले आहे. मात्र आम्ही त्यांना असे कधी सांगितले नाही की, तुम्ही अमुक एखाद्या धर्माला फॉलो करा, दुस-या धर्माचा तिरस्कार करा. मला वाटते सध्या जो काही दुरावा आहे तो कालांतराने कमी होत जाईल. लव जिहाद सारखी गोष्ट ही राजकारणांनी लोकांनी काढलेली आहे. माझी आई निरक्षर होती. माझी वाढ ही परंपरागत धार्मिक वातावरणात झाली. दिवसातून पाचवेळा नमाज होती. रोजे ठेवले जात होते. हजची यात्रा होती.

एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी सांगितले की, मला धर्मपरिवर्तन मान्य नाही. सध्या समाजात दोन धर्मात वाढत चाललेली दरी पाहून मला फार अस्वस्थ वाटते. जसे की आता युपीमध्ये लव जिहादच्या नावानं जो काही तमाशा चालला आहे त्यावरुन परिस्थितीचा अंदाज येईल. असे लोक लव जिहादच्या नावानं ओरडत आहेत की ज्यांना त्याचा अर्थही माहिती नाही. मुस्लिम लोकांची लोकसंख्या वाढत आहे यावर शहा म्हणाले, कोणी अशा मुर्ख पध्दतीनं विचार करत असेल असे मला वाटत नाही.

भारतात येत्या काळात मुस्लिमांची संख्या हिंदूपेक्षा अधिक असेल असे म्हणणे वेडेपणा म्हणावा लागेल. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यांत उत्तर प्रदेशात लव जिहादच्या नावानं एक कायदा संमत करण्यात आला होता. त्यानंतर हरियाणा आणि मध्यप्रदेश यांनीही त्याच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. हे असे करणे म्हणजे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी वाढविण्याचा प्रकार आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT