मनोरंजन

निल नितीन मुकेशला आणि कुटुंबाला झाली कोरोनाची लागण; घरीच झाले क्वारंटाईन

निल आणि त्याचे पुर्ण कुटुंब घरीच क्वारंटाईन झाले आहे.

सकाऴ वृत्तसेवा

मुंबई : सध्या भारत देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. बॉलिवूड देखील कोरोनाच्या विळख्यात अडकलेले पाहायला मिळत आहे. नुकताच बॉलीवुडमधील प्रसिध्द अभिनेता निल नितीन मुकेशला आणि त्याच्या कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. निलने नुकतेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

निल आणि त्याचे पुर्ण कुटुंब घरीच क्वारंटाईन झाले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये निलने लिहीले, ‘माझ्या कुटुंबाला आणि मला कोरोनाची लागण झाली आहे. आम्ही घरातच क्वारंटाईन झालो आहोत. सर्व आवश्यक नियम पाळूनही आणि घरीच राहूनही आम्हाला कोरोना झाला. सर्व प्रोटोकॉलचे पालन आम्ही करत आहोत. डॉक्टरांनी दिलेली औषधे आम्ही खात आहोत. तुम्ही दिलेल्या आशिर्वादांबद्दल धन्यवाद. तुम्ही सर्व जण काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.’ या पोस्टला निलने कॅप्शन दिले, ‘तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे.’

निलच्या अनेक चाहत्यांनी या पोस्टला कमेंट करून त्याला आणि कुटुंबाला काळजी घेण्यास सांगितले आहे. निलचे वडिल नितीन मुकेश हे प्रसिध्द गायक आहेत. 2017 मध्ये निलचे रूक्मिणी सहाय सोबत लग्न झाले. निलला नुर्वी नावाची गोंडस मुलगी झाली आहे. बॉलीवुडमधील अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, गोविंदा, आर माधवान, बप्पी लहरी, अक्षय कुमार, आमिर खान, कटरीना कैफ आणि विक्की कौशल या प्रसिध्द बॉलीवुडमधील कालाकारांना कोरोना झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT