Onkar Bhojane Video Esakal
मनोरंजन

Onkar Bhojane Video: 'नाही मोठेपणाचा आव रे..', ओंकार भोजनेच्या कवितेनं जिंकली मनं! 'तो' व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

Onkar Bhojane Video: मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता ओंकार भोजने हा चर्चेत असतो. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातुन घरघरात पोहचलेला ओंकार हा नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतो. त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडल्यानंतर त्याच्यावर टिकाही झाली होती.

त्यानंतर तो 'फू बाई फू' मध्ये गेला. टीका झाली मात्र ओंकारनं त्यानंतर कधी मागे वळून पाहिलं नाही. तो 'सरला एक कोटी' या चित्रपटातही दिसला. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नसला तरी त्याच्या भुमिकेचं अन् अभिनयाचं प्रेक्षकांनी आणि समिक्षकांनी तोंड भरुन कौतुक केलं.

सध्या त्याचं 'करून गेलो गाव' धम्माल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात काम करत आहे. 'मालवणी' बोली भाषेतील हा भन्नाट कॉमेडी ड्रामा आहे.

ओंकार हा उत्तम अभिनेत्याबरोबरच उत्तम कवी देखील आहे. त्याच्या कविता बऱ्याचदा सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. ओंकारनं पुन्हा एक कविता सादर केली. या त्याच्या या कवितेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

ओंकार भोजनेने एका कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांसमोर बोलताना एक कविता सादर केलीय. ही कविता सध्या चांगलीच व्हायरल झालीय. या कवितेत ओंकार म्हणतो,

"Talent ची आमच्या गावभर चर्चा

नाही मोठेपणाचा आव रे

कुणी निंदा कुणी भी वांदा

चिपळूण आमचं गाव रे"

उपस्थितांसमोर ही कविता ओंकारने सादर केलीय. ओंकारच्या या कवितेला उपस्थित प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. हा जुना व्हिडिओ असून ओंकारने सरला एक कोटीच्या प्रमोशन दरम्यान ही कविता एका कार्यक्रमात सादर केलीय.

या कवितेखाली ओंकारच्या फॅन्सनी कमेंट केलीय. याआधीही ओंकारच्या एका कवितेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 'तुझीच तुला पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची' , तसेच ‘तू दूर का… अशी तु दूर का.. मी असा मजबूर का’ असे या कवितेचे शब्द होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT