actor onkar bhojane perform poem tu dur ka during drama video viral sakal
मनोरंजन

Onkar Bhojane Video: तू दूर का.. भर नाटकात प्रेक्षकांसाठी ओंकार भोजनेनं म्हटली कविता.. व्हिडिओ व्हायरल..

अभिनेता ओंकार भोजने सध्या बराच चर्चेत आहे.

नीलेश अडसूळ

Onkar Bhojane viral Video: महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आलेला एक चेहरा म्हणजे ओंकार भोजने. या शोमुळे तो घराघरात पोहोचला. पण हा शो सोडताच त्याची चर्चा ही झाली.

चर्चा झाली कारण त्याने हास्य जत्रा सोडून 'फू बाई फू' मध्ये प्रवेश केला. त्यावर खूप टीका झाली पण त्याने मागे वळून पाहिलं नाही. यश- अपयश दोन्हीही मिळवत त्याने पुढे वाटचाल केली. दरम्यान त्याचा 'सरला एक कोटी' हा चित्रपट येऊन गेला.

आणि आता त्याचे 'करून गेलो गाव' धम्माल विनोदी नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकाला सध्या हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे. याच नाटकाच्या प्रयोगा दरम्यान ओंकारनं एक कविता सादर केली. या कवितेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.

(actor onkar bhojane perform poem tu dur ka during drama video viral)

ओंकार भोजनेचा नाटकादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत तो त्याची एक खास कविता सादर करताना दिसत आहे. ‘तू दूर का… अशी तु दूर का.. मी असा मजबूर का’ असे या कवितेचे शब्द आहेत.

ओंकारने ही कविता या आधी हास्यजत्रेच्या मंचावर ही सादर केली होती. तेव्हापासून ओंकार जिथे जिथे जातो तिथे त्याला ही कविता सादर करण्याची मागणी होते. अगदी नाटकातही ओंकार ने ही कविता सादर केली. सध्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

“तू दूर का… अशी तू दूर का…
मी असा मजबूर का…
मनाला मनाची खरी ओढ राही
अलबेल सारे तरी गोड नाही
पाहण्या तुला मन हे आतुर का…
तू दूर का…अशी तू दूर का…'' अशी ही कविता आहे.

दरम्यान ओंकार भोजने लवकरच 'कलावती' नावाच्या चित्रपटात झळकणार आहे. या शिवाय त्याचे दोन- तीन सिनेमे चित्रित होऊन प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. सध्या तो त्याच्या 'करून गेलो गाव' नाटकाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 'मालवणी' बोली भाषेतील हा भन्नाट कॉमेडी ड्रामा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT