actor Omkar Bhojane trolls for quit maharashtrachi hasya jatra and starting fu bai fu
actor Omkar Bhojane trolls for quit maharashtrachi hasya jatra and starting fu bai fu  sakal
मनोरंजन

Onkar Bhojane: खळखळून हसवणाऱ्या ओंकार भोजनेवर सडकून टीका.. का होतोय ट्रॉल?

नीलेश अडसूळ

Onkar Bhojane: आपल्या अभिनयाने आणि दमदार विनोदाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. गेली काही वर्षे ओंकारने आपल्याला सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून खळखळून हसवले. या कार्यक्रमाचा आणि पर्यायाने ओंकार भोजनेचा देखील चाहतावर्ग मोठा आहे. पण नुकताच ओंकार ने मोठा धक्कादायक निर्णय घेतला. ज्यामुळे चाहते त्याच्यावर नाराज झाले असून, त्याला ट्रॉल करत आहेत.

(actor Omkar Bhojane trolls for quit maharashtrachi hasya jatra and starting fu bai fu)

ओंकारने काही दिवसंपूर्वीच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला रामराम केला आणि झी मराठीवरील 'फू बाई फू; या कार्यक्रमात प्रवेश केला. सुरवातीला त्याच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. पण 'फू बाई फू' या कार्यक्रमातील त्याचे काम आणि एकूणच वातावरण पाहून चाहते प्रचंड नाराज झाले आहेत. त्याने घेतलेला निर्णय हा चुकीचा असून त्याने लवकरात लवकर हास्यजत्रेत पुन्हा जावे अशी मागणी चाहते करत आहेत. अनेकांनी त्याच्यावर सडेतोड टीकाही केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने ओंकारला खरी ओळख मिळवून दिली. याच कार्यक्रमामुळे त्याचा चाहता वर्ग लाखोंच्या घरात गेला. असं सगळं असतानाही त्याने हास्यजत्रा सोडणे योग्य नाही, असे सल्ला त्याला चाहत्यांनी दिला आहे. तो 'फू बाई फू' कार्यक्रमात गेल्यानंतर झी मराठीने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत ओंकार भोजने, आशिष पवार, सागर कारंडे आणि पंढरीनाथ कांबळे हे विनोदवीर स्किट सादर करताना दिसत आहेत. या व्हीडिओतील ओंकारचे काम समाधानकारक नसल्याने चाहत्यांनी त्याला ट्रॉल केले आहे.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. 'ओंकार भोजने, फर्स्ट टाइम फक्त्त तुझ्यासाठी हा प्रोग्राम बघायला आले…अजिबात आवडलं नाही, तू इथे येऊन फार मोठी चूक केली आहेस…असं माझं वैयक्तिक मत आहे.. फक्त्त इथे येऊन तू तुझं करिअर बरबाद करू नकोस… बाकी पुढे तुझं नशीब. स्वामी तुला लवकरच सुबुद्धी देवोत, ॐ श्री स्वामी समर्थ' असे एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

'२० टक्के वाढीसाठी ८० टक्के करिअर खराब होतंय', 'झी मराठी वाहिनीचे विशेष आभार… महाराष्ट्राची हास्यजत्राचा आदार कित्येक पटीने वाढला. ओंकार भावा चूकलास', 'ओमकार भोजने मला फार वाईट वाटतेय तुझा निर्णय अजुनही बदल. हास्यजत्रामध्ये आम्ही तुला मिस करतोय अग अग आई', ' अजुन खूप काही आहे.. प्लीझ वेळ गेली नाही. हास्यजत्रेमध्ये परत ये', अशा अनेक कमेंट्स त्याच्यासाठी आल्या आहेत. चाहत्यांनी त्याला ट्रोल केले असले तरी ही त्याच्यावरचे प्रेमच आहे. चाहते त्याच्या कामाचे दिवाने असल्याने त्याला पुन्हा 'हास्य जत्रेत' येण्याची विनंती करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT