Actor Pankaj Tripathi Steps Down As Election Commission's National Icon esakal
मनोरंजन

Pankaj Tripathi: पंकज त्रिपाठींनी सोडले निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन पद! कारण...

पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.

Vaishali Patil

अभिनेता पंकज त्रिपाठी सध्या त्यांच्या 'मैं अटल हूँ' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ते या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. त्यातच आता पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय आयकॉन पदाचा राजीनामा दिल्याची बातमी समोर आली आहे.

'मैं अटल हूं' या चित्रपटामुळे आणि काही राजकीय कारणामुळे पंकज त्रिपाठी आता लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. कारण त्यांनी या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

पंकज त्रिपाठी यांनी निवडणूक आयोगाच्या नॅशनल आयकॉन पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 2022मध्ये निवडणूक आयोगाने पंकज यांची नॅशनल आयकॉन म्हणून नियुक्ती केली होती.

निवडणूक आयोगाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे कि, "सिनेमा पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयी यांची राजकीय भूमिका साकारत आहेत. पंकज त्रिपाठी यांनी MOU ने दिलेल्या अटींनुसार स्वतःहून ECI च्या नॅशनल आयकॉनचे म्हणून पद सोडले आहे. ऑक्टोबर 2022 पासून मतदार जागरूकता आणि SVEEP मध्ये त्यांनी दिलेल्या प्रभावी योगदानाबद्दल ECI कृतज्ञता व्यक्त करते."

पंकज यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, "बिहारमधील प्रत्येकजण राजकारणी आहे. मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सदस्य होतो. माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये राजकारणात येण्याचा कधीही विचार केला नव्हता. ही फक्त कल्पना होती, पण मग अटक झाली आणि पोलिसांनी मला मारहाण केली, म्हणून मी ती कल्पना तिथेच सोडली."

या चित्रपटाबद्दल बोलाताना पंकज त्रिपाठींनी सांगितले होते की, मोठ्या पडद्यावर अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणं हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.

माझ्यासाठी श्री अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका चित्रपटापेक्षा माझ्या हृदयाच्या जवळ होती. ते एक महापुरुष होते आणि त्याची कथा जगासमोर आणणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला आशा आहे की हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल.

पंकज त्रिपाठींचा 'मैं अटल हूं' हा चित्रपट 19 जानेवारीला थिएटरमध्ये रिलिज होणार आहे. रवी जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT