Prakash Raj esakal
मनोरंजन

Prakash Raj : प्रकाश राज यांनी उडवली चांद्रयान-३ ची खिल्ली, नेटकरी प्रचंड संतापले!

रोहित कणसे

Chandrayan 3 : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेले अभिनेते प्रकाश राज यांनी केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही मोठे नाव कमावले आहे. 'वॉन्टेड', 'सिंघम', 'दबंग २' आणि 'पोलिसगिरी' या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या आहेत. दरम्यान प्रकाश राज यांनी चांद्रयान-३ लँडिंगपूर्वी इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवल्याने त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

देशात वेगवेगळ्या ठिकाणी चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या सुरक्षित लँडिंगसाठी विशेष प्रार्थना आणि विधी केले जात आहे. यादरम्यान प्रकाश राज यांनी ट्विटर वर इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांचे चहा ओततानाचे एक व्यंगचित्र असलेली पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला त्यांनी कॅप्शन देखील दिलं असून यामध्ये "ब्रेकिंग न्यूज:- विक्रम लँडरकडून चंद्रावरील पहिला फोटो येत आहे. वॉव" असं म्हटलं आहे.

प्रकाश राज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात मात्र त्यांनी चांद्रयान ३ ची देखील खिल्ली उडवल्याने नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी प्रकाश राज यांच्या या ट्वीटला उत्तरे दिली आहेत.

या पोस्टनंतर अभिनेते प्रकाश राज यांना मात्र यासाठी प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. राम नावाच्या एका युजरने इस्रो गौरवशाली भारताचे प्रतिनिधित्व करते. तुटपुंजे संसाधने आणि निराशावादी वातावरण असतानाही अनेक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. काही मोजक्याच देशांनी साध्य केले ते इस्त्रोने मिळवून दाखवलं आहे. आता जगातील काही मोजक्या संस्थामध्ये इस्रोचाही समावेश होतो. हा माणूस भारताचील सर्वात वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. ज्या राष्ट्राने त्याला खूप काही दिले त्या राष्ट्राचा तिरस्कार करतो.. असे म्हटले आहे.

अरुण विश्वनाथन या वापरकर्त्यांने, मोदींचा द्वेष करणे ही एक गोष्ट आहे, पण भारताच्या विकासाचा द्वेष करणे ही घृणास्पद गोष्ट आहे आणि केवळ प्रकाश राज यांच्यासारखे नीच प्राणीच करू शकतात! चंद्रमोहीम ही भारताची शान आहे आणि संपूर्ण देश या प्रकल्पामागे आहे, अशा देशद्रोही वगळता ज्यांना भारताचा विकास होऊ द्यायचा नाही! अशा शब्दात प्रकाश राज यांना सुनावलं आहे.(Latest Marathi News)

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण गेल्या १९ जुलै रोजी झाले होते. यापूर्वी २०१९ मध्ये चांद्रयान-२ लाँच करण्यात आले होते परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते अयशस्वी झाले होते चांद्रयान-३ हे येत्या २३ ऑगस्ट २०२३ (बुधवार) रोजी भारतीय वेळेनुसार १८:०४ च्या सुमारास चंद्रावर उतरणार आहे.

चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करण्यासाठी इस्त्रोकडून प्रयत्न केले जात आहेत. ही लँडिंग यसस्वी झाल्यास भारत हा युनायटेड स्टेट्स, रशिया आणि चीननंतर हा पराक्रम करणारा जगातील चौथा देश ठरेल. चांद्रयान-3 मोहिमेच्या लँडरला विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले आहे, ज्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT