actor prakash raj tweet on pm narendra modi controversial tweet viral  sakal
मनोरंजन

Prakash Raj: "नेमकं रिकामं काय? हातातला फोल्डर की त्यांचं डोकं?" प्रकाश राज यांनी पुन्हा नरेंद्र मोदींना डिवचलं

Vaishali Patil

प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. समाजातील वेगवेगळ्या घडामोडी असो किंवा राजकारणातील काही विषय प्रकाश हे तितक्याच पोटतिडकीनं भूमिका घेत ठामपणे बोलत असतात.

आपल्या भूमिकेवर ठाम राहून नेहमीच समाजातील वेगवेगळ्या गोष्टींवर आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या प्रकाश राज यांचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. ते सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांना खटकणाऱ्या गोष्टी पोस्ट करत त्यावर सडेतोड भाष्य करत असतात.


काही दिवसांपुर्वी त्यांनी चांद्रयान 3 वर केलेलं ते वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता त्यातच त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

संसदेच्या विशेष अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. संसदेच्या नवीन इमारतीमध्ये हे अधिवेशन संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आले होते.

याचीच सर्वत्र चर्चा आहे. त्यातच आता प्रकाश राज यांनी ट्विटवर एक फोटो पोस्ट केला जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. या फोटोसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये असे काही लिहिले की त्याची सर्वत्र चर्चा तर झालीच मात्र प्रकाश राज यांच्यावर टीकाही केली आहे.

या फोटोत नरेंद्र मोदी हे एक रिकाम्या फोल्डरसोबत दिसताय आणि त्याचा एक हात हा त्यांच्या खिशात आहे.

नरेंद्र मोदींचा फोटो ट्विट करत प्रकाश राज लिहितात की, "2014 पासून नेहमी पडणारे कोडे, नेमकं काय रिकामं आहे हे मला सांगा.. ते घेऊन जात असलेला फोल्डर... त्यांच्या जॅकेटचा खिसा की त्यांचं डोकं.."

हे ट्विट शेयर करत आता नेमकं प्रकाश राज यांना काय बोलायचं आहे आणि त्यांनी नरेंद्र मोदींची पुन्हा खिल्ली उडवली आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. आता हे ट्विट चर्चेत आलं आहे. नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Marathi News Live Updates : माझी विनंती आहे कोर्ट आदेश डेसिबल पातळी पाळून गणेश उत्सव साजरा करावा - मेधा कुलकर्णी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

SCROLL FOR NEXT