actor Prasad Khandekar movie Ekda yeun Tar Bagha not getting theatre screens DCM Fadanavis assured him SAKAL
मनोरंजन

Prasad Khandekar: 'एकदा येऊन तर बघा' पण थिएटरच नाही.. खांडेकरांच्या सिनेमाची चर्चा अधिवेशनात, फडणविसांनी दिलं आश्वासन

प्रसाद खांडेकरच्या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्यात आला

Devendra Jadhav

Ekda Yeun Tar Bagha News: सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होतेय. अशातच हिवाळी अधिवेशनात मराठी सिनेमांविषयीचा एक गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आलाय.

प्रसाद खांडेकर लिखित - दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' सिनेमा उद्या संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय. अशातच सिनेमाला थिएटर मिळत नसल्याने प्रसादने नाराजी व्यक्त केलीय.

प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला गंभीर मुद्दा

आमदार प्रवीण दरेकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. दरेकर म्हणाले, "बोरीवलीमध्ये प्रसाद खांडेकर नावाचे कलाकार आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे ते लोकप्रिय आहेत. त्यांचा आगामी सिनेमा एकदा येऊन तर बघा रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. पण इंडस्ट्रीतले काही बॉस - दादा लोकं आहेत, जे सिनेमाला थिएटर मिळू जेत नाहीत. प्रसाद हा मराठी तरुण सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं.

फडणवीसांचं आश्वासन

दरेकरांनी मुद्दा उपस्थित केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "प्रसाद खांडेकर हा अतिशय गुणी कलावंत आहे. हास्यजत्रेच्या माध्यमातुन सातत्याने तो लोकांचं मनोरंजन करत आहे. जर त्याच्या मराठी सिनेमाला थिएटर मिळत नसेल तर आवश्यकतेनुसार कायगेशीर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी आश्वासन दिलं.

एकदा येऊन तर बघा सिनेमाबद्दल

एकदा येऊन तर बघा सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, ओंकार भोजने, भाऊ कदम, वनिता खरात, रोहित माने असे कलाकार आहेत.

या सिनेमाचं लेखन - दिग्दर्शन प्रसादने केलं असुन स्वतः प्रसाद खांडेकर सुद्धा सिनेमात भुमिका साकारणार आहे. हा सिनेमा उद्या ८ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

Prashant Kishor on Bihar Election: अखेर प्रशांत किशोर यांनी निवडणूक न लढवण्यामागचं नेमकं कारण सांगितलं, म्हणाले..

पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय! सोलापूर शहरात रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत नाकाबंदी; प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत एक विशेष पथक

Baidpura Violence : गोमांस विक्रीच्या संशयावरून दोन गट आमनेसामने; दोन्ही गटाकडून तक्रारी, अदखलप्राप्त गुन्हे दाखल

Pune Traffic : पुणे-सातारा बाह्यवळण मार्गावर दिवाळीच्या गर्दीत वाहतूक कोंडीचा कहर

SCROLL FOR NEXT