actor prasad oak buy new home in 2024 and wishes everyone happy new year SAKAL
मनोरंजन

Prasad Oak New Home: वर्षाच्या सुरुवातीलाच प्रसाद ओकने केला नवीन घरात प्रवेश, दाखवला व्हिडीओ

अभिनेता प्रसाद ओकने नवीन वर्षात त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिलीय

Devendra Jadhav

Prasad Oak New Home News: प्रसाद ओक हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. प्रसाद सध्या अनेक सिनेमांमध्ये अभिनय करत आहे. प्रसाद 'धर्मवीर 2', 'वडापाव', 'रील स्टार' अशा अनेक सिनेमांमध्ये झळकणार आहे.

अशातच प्रसादने त्याच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिलीय. प्रसादने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सहकुटुंब नवीन घरात प्रवेश केलाय. प्रसादने नवीन घराचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केलाय.

प्रसाद ओकने शेअर केला नवीन घराचा व्हिडीओ

प्रसादने नवीन घराचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये प्रसादच्या दाराबाहेर ११०२/११०३ अशी अनोखी पाटी लावलेली दिसतेय. पुढे घराच्या दाराबाहेर प्रसाद ओकसोबत पत्नी मंजिरी आणि मुलं सार्थक आणि मयंक पाहायला मिळत आहेत.

प्रसादने नवीन घर घेतल्याबद्दल मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलंय.

प्रसादचं वर्कफ्रंट

प्रसाद सध्या विविध विषयांवरच्या सिनेमांमध्ये अभिनय करत आहे. प्रसादने काहीच दिवसांपुर्वी तो 'रील स्टार' नावाच्या सिनेमात अभिनय करत असल्याचं सांगितलं. या सिनेमात प्रसाद न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसणार आहे.

याशिवाय तो 'धर्मवीर 2' चं शूटींग करत आहे. या सिनेमात तो पुन्हा एकदा आनंद दिघेंची भूमिका साकारणार आहे. याशिवाय तो 'पठ्ठे बापूराव' सिनेमात बापूरावांची प्रमुख भूमिका साकारणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तो स्वतः करत आहे.

याशिवाय प्रसाद सध्या 'जिलबी', 'वडापाव' आणि 'महापरिनिर्वाण' या मराठी सिनेमांच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT