Rakesh Bedi: Esakal
मनोरंजन

Rakesh Bedi: हिमाचल प्रदेशात झालेल्या भूस्खलनात अडकला प्रसिद्ध अभिनेता! हाताचं बोट तुटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी नुकतेच हिमाचल प्रदेशात अडकले होते. यादरम्यान अभिनेत्याच्या बोटालाही खूप त्रास झाला. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करून या घटनेची माहिती दिली आहे.

Vaishali Patil

Landslide In Himachal : टीव्ही शोपासून ते चित्रपटांपर्यंत आपल्या अनेक वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांना हसवणारे अभिनेते राकेश बेदी लोकप्रिय अभिनेते आहेत. मात्र नेहमी हसवणाऱ्या राकेश बेदी यांनी नुकताच एक धक्कादायक अनुभव चाहत्यांसोबत शेयर केला आहे. ज्यावेळी ते हिमाचल प्रदेशात भूस्खलनात ते अडकले होते तेव्हाचा किस्सा त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यामातुन सांगितला आहे.

राकेश बेदी नुकतेच हिमाचल प्रदेशात गेले होते. पूर आणि पावसाने हिमाचल प्रदेशात सर्वत्र कहर केला आहे हे सर्वांनाच माहीत आहे. अजूनही 8 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट दिला आहे. हिमाचलमध्ये निसर्गाच्या कहरामुळे 71 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तेथील परिस्थिती खुपच भयावह आहे. अशा स्थितीत अभिनेते राकेश बेदीही तिथे अडकले मात्र सुदैवाने ते थोडक्यात बचावले आणि आपल्या घरी पोहोचले.

'सध्या हिमाचलच्या शिमला आणि उत्तराखंडमध्ये काय स्थिती आहे ते पाहत आहोत. दोन आठवड्यांपूर्वी मी हिमाचलमधील सोलन येथे गेलो होतो. मला अभिनयाचे व्याख्यान द्यायचे होते. त्याचवेळी वारंवार भूस्खलन होत होते. मुख्य महामार्ग बंद असल्याने मी खूप अडकलो. पण काही लोकांनी सांगितले की दुसरा मार्ग आहे, तुम्ही तिथून जा. पण त्याच वाटेत त्यांच्या गाडीसमोर एक मोठा दगड पडला.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत राकेश यांनी सांगितलं की, "आजकाल आपण पाहतच आहोत की हिमाचलच्या शिमला आणि उत्तराखंडमध्ये किती वाईट स्थिती आहे. दोन आठवड्यांपूर्वी मी हिमाचलमधील सोलन येथे गेलो होतो. एक व्याख्यान होणार होते. वारंवार भूस्खलन होत होते. मुख्य महामार्ग बंद असल्याने मी अडकलो. आम्ही परतत असताना आम्हाला सांगण्यात आले की दरड कोसळल्यामुळे मुख्य महामार्ग बंद झाला आहे आणि आम्ही शॉर्टकट घ्यावा. पण त्याच वाटेत त्यांच्या गाडीसमोर एक मोठा दगड पडला.

व्हिडिओत पुढे ते म्हणतात की, आम्ही देवाचे आभारी आहे की तो दगड आमच्या गाडीवर पडला नाही. त्यानंतर मी ही-मॅन बनण्याचा प्रयत्न करत रस्त्यावरून दगड हटवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या बोटाला दुखापत झाली. अर्ध बोट तुटलं . मात्र, आता बोटाची दुखापत बरी झाली आहे. त्यानंतर जेसीबी मशिनच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला.

यावेळी भूस्खलनामुळे अडकलेल्या सर्व लोकांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

'चष्मे बद्दूर' सारख्या चित्रपटांतून आणि 'श्रीमान श्रीमती' सारख्या टीव्ही शोमधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. राकेश यांनी अनेक चित्रपट, वेबसिरीज आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

राकेश हे नुकतेच विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात दिसले होते.

सनी देओलच्या 'गदर 2' मध्येही त्यांनी छोटी भूमिका केली होती. त्याचबरोबर राकेश यांनी टीव्हीवर 'भाभी जी घर पर हैं' आणि 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अशा लोकप्रिय कॉमेडी शोमध्ये काम केले आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT