upasana and ram charan Sakal
मनोरंजन

Upasana Baby Shower: राम चरणची पत्नी उपासनाचे दुबईत झाले बेबी शॉवर, फोटोंमध्ये दिसली सेलिब्रेशनची झलक

राम चरणने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेलाच्या गरोदरपणाची माहिती शेअर केली होती.

सकाळ डिजिटल टीम

साऊथ सुपरस्टार राम चरण लवकरच वडील होणार आहे. अभिनेत्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेलाच्या गरोदरपणाची माहिती शेअर केली होती. त्याच बरोबर एप्रिल महिन्यात उपासनाचे बेबी शॉवर देखील पूर्ण झाला आहे. बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे दुबईतील असल्याचे सांगितले जात आहे.

हे जोडपे लग्नाच्या 10 वर्षानंतर पालक बनणार आहेत. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरून त्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. फोटोंमध्ये, पांढऱ्या लेसच्या मॅक्सी आउटफिटमध्ये उपासना खूपच सुंदर दिसत आहे. तसेच, ते बेबी शॉवर फंक्शनचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत.

upasana

उपासनाने तिचा लूक अतिशय साधा ठेवला होता, हे बेबी शॉवरचे फोटो पाहता स्पष्टपणे कळते. खुल्या केसांमध्ये, मिनिमल मेकअपमध्ये उपासनाचे प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसते. यासोबतच तिने काळा चष्माही लावला आहे. राम चरणची लेडी लव्हने तिच्या लूकला डायमंड इअरिंगसह पूर्ण केले आहे.

राम चरणने 'RRR' चित्रपटातील 'नाटू-नाटू' गाण्याच्या ऑस्कर जिंकण्याचे श्रेय पत्नी उपासना यांना दिले होते. सुपरस्टारने एका मुलाखतीत सांगितले होते, 'माझी पत्नी माझ्यासाठी नेहमीच भाग्यवान राहिली आहे. त्याच वेळी, माझे येणारे मूल खूप भाग्यवान आहे.

upasana

राम चरण आणि उपासना कामिनेनी सोशल मीडिया पोस्टद्वारे लवकरच पालक बनल्याची माहिती दिली होती. हे जोडपे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी खूप उत्सुक आहे. राम चरणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत त्याच्या आगामी 'गेम चेंजर' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

upasana
upasana

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

SCROLL FOR NEXT