actor Riteish Deshmukh on Manoj Jarange patil maratha reservation andolan social media post on x  Esakal
मनोरंजन

Riteish Deshmukh on Manoj Jarange: अभिनेता रितेश देशमुखचा जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा; व्यक्त केली 'ही' अपेक्षा

रितेश देशमुखने जरांगे पाटलांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा पण 'सरसकट'बाबत घेतली सावध भूमिका

Devendra Jadhav

Riteish Deshmukh on Manoj Jarange Patil:

सध्या मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे. आज ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आंदोलन केलंय. अनेक जण या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत आहेत.

अशातच हिंदी - मराठी इंडस्ट्री गाजवलेला रितेश देशमुखने मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी काळजी करुन X वर केलेलं ट्विट चर्चेत आहे.

(actor Riteish Deshmukh on Manoj Jarange patil maratha reservation andolan social media post on x)

रितेशचं मराठा आरक्षणासाठी खास ट्विट

रितेश देशमुखने X वर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा फोटो शेअर केलाय. त्यावर रितेश लिहीतो, "जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो."

सरसकट आरक्षण द्या: मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सांगितले कि, मंगळवार (ता. 31) रोजी मुंबई येथे राज्यातील सर्व जिल्हाधिकारीना बोलवा व सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मंत्रिमंडळ बैठकित निर्णय घ्या या शिवाय हे आंदोलन थांबणार नाही, मंत्रीमंडळ बैठित निर्णय घ्या शासनाला जो वेळ पाहिजे तो दिला आहे.

शांततेत आंदोलन करण्याचं जरांगेंचं आवाहन

"मराठा समाजाला आवाहन आहे शांततेत आंदोलन करा आत्महत्या करू नका". असे मनोज जरांगे यांनी सांगितले. उपोषणाच्या 6 व्या दिवशी हि मनोज जरांगे यांनी वैद्यकिय उपचार नाकारले. समाज बांधव व महिला यांनी पाणी घेण्यासाठी मोठा आग्रह जरांगे यांना केला तेव्हा विनंतीचा मान ठेवुन दोन घोट पाणी जरांगे यांनी घेतले. या वेळी जरांगे यांना अश्रू अनावर झाले डोळ्यात पाणी आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT