actor riteish genelia deshmukh got clean chit in bjp allegations in latur midc land deal  
मनोरंजन

Riteish Genelia News : भाजपचे नेत्याचे आरोप फोल! रितेश-जेनेलिया देशमुख जोडीला मोठा दिलासा

रोहित कणसे

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची कंपनी देश अॅग्रोची चौकशी पुर्ण झाली आहे. निबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशीत देखील काहीही आढळलं नाहीये. देशमुख यांच्या अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अनियमितता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. दरम्यान सहकार खात्यांनंतर निबंधक कार्यालयाकडून देखील दोघांना क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांना मोठा दिलासा मिळाला आहे.

भाजपकडून यासंबंधी जोरदार आरोप करण्यात आले होते, मात्र चौकशीअंती अशी कुठलीही अनियमितता आढळली नाही. आम्हाला एक पहाणी अहवाल मिळाला आहे, संपूर्ण अहवाल मिळाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन याविषयी पुढील लढाई सुरू ठेवू अशी माहिती आमदार रमेश कराड यांनी दिली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

प्रकरण काय आहे?

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची लातूर एमआयडीसीमध्ये देश अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीला महिन्याभराच्या आतच 120 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आल्याचा आरोप स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केला होता.

हेही वाचा - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

लातूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) २०१९ पासून १६ उद्योजकांचे प्रस्ताव प्रलंबित असताना अभिनेते रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख हे भागीदारी असलेल्या मे. देश ॲग्रो प्रा. लि. या कंपनीला अवघ्या २२ दिवसांत दोन लाख ५२ हजार ७२६ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाचे वाटप झाले.

इतकेच नव्हे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या कंपनीला तातडीने ११६ कोटी व पंढरपूर अर्बन बँकेने चार कोटी रुपये कर्ज दिले,असा अरोप करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT