saif ali khan and ntr  Sakal
मनोरंजन

NTR 30: ज्युनियर एनटीआर-जान्हवी कपूरच्या चित्रपटात सैफ अली खानची एन्ट्री, फोटो व्हायरल...

जान्हवी कपूरनंतर आता सैफ अली खानही 'एनटीआर 30' या चित्रपटाचा भाग असणार आहे.

Aishwarya Musale

ज्युनियर एनटीआरच्या 'एनटीआर 30' चित्रपटाविषयी सतत अपडेट मिळतात. या चित्रपटात बॉलिवूडच्या सर्व स्टार्सचीही एन्ट्री होत आहे. जान्हवी कपूरनंतर आता सैफ अली खानही या चित्रपटाचा भाग असणार आहे.

या चित्रपटात सैफची एंट्री होऊ शकते अशी बातमी आधीच आली होती, पण आज एका फोटोसह अधिकृतपणे सैफ अली खान चित्रपटात दिसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

एनटीआर आर्ट्सच्या ट्विटर अकाउंटवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत, ज्यामध्ये ज्युनियर एनटीआरसोबत सैफ अली खान दिसत आहे. या चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका दिसणार असल्याची चर्चा आहे.

सैफ आधी निगेटिव्ह रोल करायला तयार नव्हता अशा बातम्याही आल्या होत्या, पण आता त्याने याला होकार दिल्याचं दिसतंय. याआधी संजय दत्तनेही साऊथ सिनेमात पाऊल ठेवले होते आणि तो 'KGF 2' मध्येही नकारात्मक भूमिकेत दिसला होता.

सैफ अली खान शेवटचा ऋतिक रोशनसोबत 'विक्रम वेधा' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवली नाही. सैफ हा बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. आता 'NTR 30' द्वारे तो साउथ सिनेमात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सैफ अली खानचा 'आदिपुरुष' हा चित्रपटही चर्चेत आहे. या चित्रपटात तो लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन व्यतिरिक्त सनी सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ओम राऊत यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला हा बिग बजेट चित्रपट असून, या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT