actor Salman khan revealed his first salary 75 rupees before Maine pyar kiya 
मनोरंजन

सलमानचा पहिला पगार होता 75 रुपये; आताची कमाई माहितीये ?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - सलमान आता एका मुव्हीसाठी किती कोटी पैसे घेतो याचा आकडा त्याच्या चाहत्यांना सांगण्याची गरज नाही. तो आता थेट टक्केवारीत बोलतो. त्याचा कोणताही चित्रपट 100 कोटींच्या पुढे सहज जातो म्हणून भागीदारीत पैसे घेतो. त्याच्यासारखे अनेक कलाकार बॉलीवूडमध्ये आहेत जे जितका नफा तेवढे मानधन अशा हिशोबात पैसे घेताना दिसतात. मात्र एकेकाळी सलमानला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी मिळालेलं मानधनाचा आकडा जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला खरं वाटणार नाही. याशिवाय त्याला ज्या जाहिरात कंपन्यांनी करारबध्द  करुन घेतले होते त्यांच्याकडून मिळणारे मानधनही फार नव्हते.

सलमान दोन ते तीन वर्षांपूर्वी फोब्सच्या यादीत असणारा भारतीय अभिनेता होता. 100 ते 200 कोटींचे मानधन घेणारा अभिनेता म्हणूनही त्याची चर्चा होती. आज भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक श्रीमंत अभिनेता म्हणून भाईजानच्या नावाचा उल्लेख होतो. त्याच्या दिलदारीचा प्रत्ययही अनेकांनी घेतला आहे. सध्या तो भारतातील प्रसिध्द अशा एका रियॅलिटी शो चा होस्ट म्हणून दिसतो. एका मुलाखतीच्या दरम्यान सलमानने आपल्या जून्या आठवणींना उजाळा दिला होता. 2013 मध्ये झालेल्या बिग बॉसच्या प्रत्येक शो साठी त्यानं 6.5 कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर त्याचे मानधन वाढत गेले. मात्र हे झाले आताचे, ज्यावेळी सलमाननं त्याचा पहिला मुव्ही साईन केला त्यावेळी त्याला मिळालेलं मानधन होत 75 रुपये.

आता सलमान एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून प्रसिध्द आहे. सलमाननं 1989 मध्ये वा बेवी हो तो ऐसी च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी त्याचा मुख्य कलाकार म्हणून पहिला चित्रपट मैंने प्यार किया हा होता. त्यावेळी सलमानला त्या चित्रपटासाठी 75 रुपयांचा चेक मिळाला होता. काही वर्षांपूर्वी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यानं ही गोष्ट सांगितली होती. सलमान म्हणाला, मी ताज हॉटेलमध्ये डान्स केला होता. त्यावेळी तिथे माझा एक मित्र डान्स करायचा. एक गंमत म्हणून तो मला तिथे घेऊन गेला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT