actor sandeep pathak tweet on politics said balasaheb thackeray wish to see marathi person as a prime minister but today it is not possible sakal
मनोरंजन

Sandeep Pathak: मराठी माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा! पण आता ते.. अभिनेत्याच्या ट्विटनं खळबळ

अभिनेता संदीप पाठकच्या ट्विटनं सध्या राजकीय विश्वात धुमाकूळ घातला आहे.

नीलेश अडसूळ

sandeep pathak on politics : नाटक, चित्रपट, मालिका अशा तिहेरी माध्यमात आपल्या अभिनयाने चौकार षटकार लागवणारा अभिनेता संदीप पाठक (sandeep pathak) याने मनोरंजन विश्वात कायमच स्वतःचे वेगळेपण सिद्ध केले आहे.

सध्या तो करत असलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' या नाटकाचे प्रयोग वाऱ्याच्या वेगाने सुरु आहेत. संदीपने आजवर अभिनयासोबत सामाजिक भान देखील जोपासले आहे. याच सामाजिक भानातून तो बऱ्याचदा राजकीय विश्वावर भाष्य करत असतो. आज पुन्हा त्याने सध्याच्या राजकीय परिस्थिती वर ट्विट केलं आहे, ज्या ट्विटनं चांगलीच खळबळ उडवली आहे.

(actor sandeep pathak tweet on politics said balasaheb thackeray wish to see marathi person as a prime minister but today it is not possible)

सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती प्रचंड बिकट आहे. भाजप- शिवसेना संघर्ष चांगलाच पेटला आहे. शिवसेनेत फुट पडली असून राज्यातील सत्ता बदल वेगळ्या दिशेने जात आहे. एकीकडे काहीजण भाजपला पाठिंबा देत आहेत तर दुसरीकडे या सगळ्या आरजकतेचे खापर भाजपच्या निर्णय प्रणालीवर फोडणारेही अनेकजन आहेत.

अशातच संदीप पाठक यांनी केलेलं ट्विट लक्ष वेधून घेत आहे. “मा.बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल. पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय…” असं संदीपने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

या ट्वीटमध्ये संदीपने राज्यातील काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे, आप, राष्ट्रवादी अशा सर्वच राजकीय पक्षांना टॅगही केलं आहे. संदीप पाठकने केलेलं हे ट्वीट सध्या चर्चेत असून चांगलीच खळबळ उडाली आहे.

तर नेटकऱ्यांनीही कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेकांनी कमेंटमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव पोस्ट केलं आहे. तर काहींनी खासदार सुप्रिया सुळे पंतप्रधान होऊ शकतात, असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT