actor santosh juvekar shared post and request to all govinda pathak for safe celebration in dahi handi gopalkala krishna janmashtmi  sakal
मनोरंजन

दही हंडी निमित्त अभिनेता संतोष जुवेकरची खास पोस्ट.. म्हणाला, जोश असुदे पण..

अभिनेता संतोष जुवेकर याने दही हंडीच्या निमित्ताने सर्व गोविंदा पथकांना आवाहन केले आहे.

नीलेश अडसूळ

santosh juvekar : झेंडा, मोरया, एक तारा आणि यासारखे कितीतरी चित्रपट गाजवलेला एक उत्तम अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. तो सोशल मिडियावरही बराच सक्रिय असतो. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. संतोष अभिनया सोबत सामाजिक कामातही बराच सक्रिय असतो. सध्या मुंबई मध्ये उत्सवाचं वातावरण आहे, त्यात सर्वांचा आवडता दहीहंडीचा उत्सव असा तोंडावर येऊन ठेपलाय. अशातच अभिनेता संतोष जुवेकर याने एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये दहीहंडीबाबत त्याची उत्सुकता तर दिसतेच शिवाय सर्व गोविंदा पथकांना त्याने आवाहनही केले आहे. (actor santosh juvekar shared post and request to all govinda pathak for safe celebration in dahi handi gopalkala krishna janmashtmi)

संतोष जुवेकर आणि दहीहंडी याचे एक विशेष नाते आहे. संतोषने 'मोरया' या त्याच्या तुफान गाजलेल्या चित्रपटात दही हंडी वर आधारित 'आला रे आला गोविंदा आला' हे गाणे चित्रित केले होते. हे गाणे प्रचंड हीट झाले होते. त्यामुळे या उत्सवाविषयी संतोषच्या मनात एक वेगळे स्थान आहे. दोन वर्षे करोनामुळे हा उत्सव होऊ शकला नाही. पण यंदा मात्रा मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी होणार आहे. त्यानिमित्ताने संतोष जुवेकरने एक खास पोस्ट लिहिली आहे.

संतोष म्हणतो, 'दोन दिवसांवर गोपाळ अष्टमी आलीये. गेली दोन वर्ष हा गोपाळकाला उत्सव साजरा करता नाही आला कारण कोविडचं संकट तीव्र प्रमाणात होतं. पण ह्या वर्षी ह्या उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे. सगळेच गोपाळ आणि गोपिका दही हंडी फोडण्याची जोरात तयारी करतायत, कस्सून सराव चाललाय.'

'कालच माझे खूप जवळचे मित्र श्री मनोज चव्हाण दादांमुळे महाराष्ट्रातल्या गाजलेल्या 'जय जवान गोविंदा पथक' जोगेश्वरी (मुंबई ) ह्यांची प्रॅक्टीस बघण्याची संधी मिळाली. क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो जोमात अहात सगळे तुम्ही. एक क्षण वाटलं आपण पण घुसावं.. पण इतकं सोप्प नाही ते लगेच जाणवलं. माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पथकांना खूप खूप शुभेच्छा आणि एक विनंती.. मित्रांनो कृपया करून स्वतःची आणि तुमच्या सोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या दहीहंडी हा सण आहे आपला, तो सणा सारखाच साजरा करा त्याची स्पर्धा करू नका. जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत. बाकी आपले #maharashtrapolice आहेतच आपल्या मदतीला आणि आवलीगीरी करणार्यांना फटके द्यायला. मज्जा करा आणि काळजी घ्या रे..' अशा शब्दात संतोषने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP-Shiv Sena alliance in Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप अन् शिवसेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर!

Guhagar-Vijaypur highway accident : गुहागर-विजयपूर महामार्गावर तामखडी नजीक भीषण अपघात; एक जण ठार तर सहाजण जखमी

Akola Municipal Election : अकोल्यात महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अखेर सुटला; प्रचाराला वेग!

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT