Actor Sayaji Shinde was attacked by bees sakal
मनोरंजन

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला..

वृक्ष संवर्धनाचे काम करत असताना मधमाशांनी हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.

नीलेश अडसूळ

Sayaji Shinde News: मराठी असून आणि मराठीपण जपून दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात आपल्या दमदार अभिनयाने दबदबा निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे. त्यांनी केवळ दाक्षिणात्यच नाही तर हिंदी,मराठी मनोरंजन विश्वालाही आपल्या अभिनयाने अवाक केले.

सयाजी शिंदेंनी जेवढी विलनची दमदार भूमिका केली तेवढीच ताकदीची भूमिका त्यांनी एका सभ्य माणसाचीही साकारली. सयाजी शिंदे आज प्रसिद्ध अभिनेते असले तरी त्यांची दुसरी बाजू अशी आहे की कौतुक करताना शब्द कमी पडतील.

सयाजी शिंदे हे कामा व्यतिरिक्त पूर्णवेळ समाजसेवेत असतात. ग्रामीण भागातील प्रश्न, पाणी समस्या आणि जंगल संवर्धनासाठी ते काम करत आहेत. वृक्ष वाचवण्यासाठी त्यांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. पण याच कामा दरम्यान त्यांना एक दुखापत झाली आहे.

पुणे-बंगलोर महामार्गावर एका ठिकाणी झाडांचं पुनर्रोपण करत असताना सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे.  

झाडांचे पुनर्रोपण करताना ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पुणे- बंगळूर महामार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. तेथील झाडांसाठी ते तासवडे येथे हजर होते. कत्तल करुन जी झाडे वाचली आहेत, त्या झाडांची शास्त्रीय पद्धतीने काटछाट करुन त्याचे पुनर्रोपण केलं पाहिजे, अशी भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे. पण याच दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचे समजले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT