shah rukh khan New Car Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: पठाणच्या यशानंतर शाहरुख खानच्या घरात आणखी एका पाहूण्याची एंट्री

Shah Rukh Khan Buy New Car: सध्या शाहरुख 'पठाण' या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या नवीन कारमुळे चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shah Rukh Khan Buy New Car: बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानने 'पठाण' चित्रपटाद्वारे तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवले. त्यामुळेच अभिनेत्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. पण सध्या शाहरुख या चित्रपटामुळे नाही तर त्याच्या नवीन कारमुळे चर्चेत आहे.

शाहरुखकडे अनेक आलिशान गाड्या असल्या तरी आता त्याच्या गॅरेजमध्ये एक रोल्स रॉयस कुलिनन देखील सामील झाली आहे. नुकतीच ही कार अभिनेत्याच्या 'मन्नत' बंगल्याच्या आत जाताना दिसली आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या आलिशान कारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये पांढऱ्या रंगाचे रोल्स रॉयस कुलीनन गाडी मन्नतच्या दरवाजातून आत जाताना दिसत आहे. कारचे हे व्हिडिओ अभिनेत्याच्या फॅन पेजवर पाहायला मिळत आहेत.

कारच्या नेमप्लेटवर '555' हा क्रमांक आहे. रिपोर्ट्सनुसार, या कारची शोरूम किंमत सुमारे 8.20 कोटी आहे आणि जर कार पर्सनलाइज असेल तर तिची किंमत 10 कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचते.

त्याचवेळी, कारच्या आधी शाहरुख खान त्याच्या महागड्या घड्याळामुळे चर्चेत होता. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या या घड्याळाची किंमत 4 कोटी 98 लाख रुपये आहे. विशेष म्हणजे 'पठाण' चित्रपटानेही कमाईच्या बाबतीत 'बाहुबली 2'ला मागे टाकले असून सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत नयनतारा आणि विजय सेतुपतीही दिसणार आहेत. याशिवाय अभिनेत्याकडे राजकुमार हिरानी यांचा 'डँकी' हा चित्रपटही चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT