actor shah rukh khan family photo Sakal
मनोरंजन

Shah Rukh Khan: आर्यन, सुहाना अन् अबरामचा भलताच स्वॅग... गौरी खानने शेअर केलेला फोटो सोशल मिडियावर ट्रेडिंगला

किंग खानच्या कुटुंबाचे काही न पाहिलेले फोटो सध्या इंटरनेट विश्वात व्हायरल होत आहेत.

Aishwarya Musale

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान नेहमीच चर्चेत असतो. किंग खानच्या चित्रपटांसोबतच त्याची लाइफस्टाइल आणि कौटुंबिक जीवनही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे. यामुळेच शाहरुख खानचे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात राहते. सोशल मीडियावर पुन्हा एकदा या खान कुटुंबाची चर्चा होत आहे आणि याचे कारण म्हणजे शाहरुख खानचा फॅमिली फोटो, जो गौरी खानने शेअर केला आहे.

गौरी खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख खान, गौरी आणि तिन्ही मुलं - सुहाना, आर्यन आणि अबराम अतिशय प्रेक्षणीय स्टाईलमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये प्रत्येकाने ब्लॅक अँड व्हाईट कपडे घातले आहेत.

याशिवाय शाहरुख खानच्या फॅन पेजवर त्याचे काही कौटुंबिक फोटोही शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शाहरुखचे चाहते फोटोंवर कमेंट करून आपले प्रेम व्यक्त करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, 'जगातील नंबर 1 फॅमिली'. आणखी एका यूजरने लिहिले, 'पठाण फॅमिलीची गोष्टच वेगळी आहे.' एका युजरने लिहिले की, 'कोणाची नजर नाही लागली पाहिजे.'

फोटो शेअर करताना गौरी खानने सांगितले की, तिचे 'माय लाइफ इन डिझाईन' कॉफी टेबल बुकही रिलीज झाले आहे. शाहरुख खान अभिनय जगतात एक मोठे नाव आहे, तर गौरी खान एक प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय असते.

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'पठाण' चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, तो त्याच्या पुढच्या 'जवान' चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट यावर्षी 2 जूनला प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'डंकी' चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT