shah rukh khan Sakal
मनोरंजन

Shah Rukh khan: शाहरुख खान कश्मीरमध्ये झाला स्पॉट, या चित्रपटाची करतोय तयारी, व्हिडिओ झाला लीक

शाहरुख खान त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. अलीकडेच तो काश्मीरमध्ये स्पॉट झाला आहे.

Aishwarya Musale

लाइम लाइटमध्ये राहण्यासाठी शाहरुख खानला कोणत्याही खास कारणाची गरज नाही. आधी पठाण मग आयपीएल आणि आता काश्मीर. होय, नुकताच किंग खान काश्मीरमध्ये स्पॉट झाला आहे. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेता त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीसाठी तिथे पोहोचल्याचे बोलले जात आहे.

शाहरुख खानचा हा व्हिडिओ अनेक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, अभिनेता त्याच्या आगामी चित्रपट डंकीच्या शूटिंगच्या संदर्भात काश्मीरला पोहोचला आहे. लीक झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुखचे ग्रँड वेलकम त केले जात आहे. त्याचवेळी पठाणच्या जबरदस्त यशानंतर डंकीबाबत लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

व्हायरल होत असलेल्या क्लिपनुसार शाहरुख सध्या काश्मीरमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार, किंग खान काश्मीरमधील सोनमर्गमध्ये डँकीच्या एका गाण्याच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी पोहोचला आहे. क्लिपमध्ये, SRK हातात पुष्पगुच्छ घेऊन काळ्या जॅकेटमध्ये हॉटेलमध्ये जाताना दिसत आहे. याआधी शाहरुख 2012 साली प्रदर्शित झालेल्या यश चोप्राच्या जब तक है जानच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये आला होता.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठाणने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. आता डंकीमध्ये शाहरुख प्रथमच तापसी पन्नूसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तापसी आणि किंग खानच्या जोडीला लोकांचे किती प्रेम मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT